क्रिकेट खेळताना हृदयविकाराच झटका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

आयुष्यात काही घटना अशा असतात, ज्या आनंदाला दु:खात बदलतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिकेट (cricket)खेळता खेळता एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वांना एक मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला क्रिकेट खेळत  हृदय विकाराचा झटका आला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. मिलिंद भोंडवे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 40 वर्षीय भोडंवे गोलंदाजी करत होता, त्यावेळी तो अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडल्याचं समजतेय. या धक्कादायक घटनेनंतर सांगवी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस होता. आज दुपारी मिलिंद यांच्या टीमचा क्रिकेट सामना होता, ते स्वतः देखील गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मैदानावर कोसळले. इतर सहकारी खेळाडूंनी धावत येऊन त्यांना नेमकं काय झालं हे पाहिलं. मिलिंद यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे. मिलिंद हे उत्तर क्रिकेट खेळायचे. त्यांचा हा क्रिकेटचा सामना शेवटचा असेल असं कुणालाच वाटले नव्हते. मावळ तालुक्यातील दारुब्रे येथील ते मूळ राहणारे आहेत. या घटनेमुळे भोंडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

प्लेऑफमध्ये आव्हान संपल्यानंतर विराट इमोशनल; म्हणाला,

शेतातून घरी येताच शेतकऱ्याने सोडले प्राण

पुणे अपघात प्रकरणात रोखठोक प्रतिक्रिया देऊन अजित पवार यांनी मौनव्रत सोडले