पती-पत्नी रेल्वे रुळावर सेल्फी काढण्यात मग्न, अचानक समोरून आली ट्रेन अन्…

नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत अनेक ठिकीणांचे दृश्य आणखीनच(train line) सुंदर दिसू लागते, ज्यामुळे या ऋतूत अनेकजणांचे फिरण्याचे प्लॅन बनत असतात. मात्र या ऋतूत कुठेही फिरताना काळजी घेणे फार गरजेचे असते. वाढते अपघतांचे प्रमाण बघता या ऋतूत प्रशासनाकडून अनेक ठिकाणांवर बंदीदेखील घालण्यात येते. मात्र अनेक उत्साही पर्यटक या बंधनांना तोडून अशा ठिकाणी जातात आणि आपला जीव गमवून बसतात.

सध्या सेल्फीचे क्रेझ फार वाढले आहे. कुठेही जाताना (train line)त्या ठिकाणी सेल्फी, फोटो किंवा व्हिडिओ काढणे जणू प्रथाच बनली आहे. मात्र असे करतानाही आपल्या आजूबाजूच्या परिस्थीची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा सेल्फी काढताना लोक इतके मग्न होतात की त्यांना समोरून येणारी प्रत्येक गोष्ट दिसेनाशी होते. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यात एक जोडपं सेल्फी काढत असताना त्यांच्यासोबत एक अपघात घडून आल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले तर दिसते की, रेल्वे पुलावर एक जोडपं सेल्फी काढण्यात मग्न आहे. मात्र त्याचवेळी त्यांच्यासमोर अचानक समोरून ट्रेन येते. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या काहींनी त्यांना आवाज देत सावधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरून वेगात येणारी रेल्वे पाहून हे जोडपं फार घाबरले आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे पुलावरून उडी मारली. यानंतर दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्यातील पतीचे नाव राहुल तर पत्नीचे नाव जान्हवी आहे. दोघेही गोरम घाटावर दर्शनासाठी आले होते. त्यानंतर प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली. यातील राहुलची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला जोधपूरला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ X अकांऊटवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

दारूची नशा तरूणाच्या बेतली जीवावर, हॉटेलवर रंगली दारू पार्टी, नशेत टेरेसवर गेला अन्…

…अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनचा खुलासा

ठाकरे गटाचा पुन्हा ‘सांगली’ पॅटर्न! अंतिम चर्चेआधीच संजय राऊतांनी २ जागांवर दावा ठोकला