“घटस्फोटानंतर मी खूप आनंदी आहे, मला…”; आमिर खानच्या एक्स पत्नीने अखेर मौन सोडलं

बॉलिवूडचा मिस्टर पर्फक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव अनेकदा(silence) त्यांच्या नात्यावर मोकळेपणानं बोलताना दिसतात. तीन वर्षांपूर्वी विभक्त झाल्याची बातमी देत त्यांनी त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का दिला होता. असं असलं तरी त्या दोघांमध्ये आजही खूप चांगली मैत्री आहे. त्यासोबत ते दोघं त्यांच्या मुलाची को-पेरेंटिंग करत आहेत. किरण रावनं ‘लापता लेडीज’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले ज्या चित्रपटाला चित्रपट समिक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण राव यांनी त्यांच्या घटस्फोटावर वक्तव्य केलं आहे.

किरण राव यांनी ही मुलाखत ‘फेय डिसूजा’ शोला(silence) दिली होती. यावेळी किरण राव म्हणाली की ‘मला वाटतं की नात्याला वेळोवेळी पुन्हा परिभाषित करणं गरजेचं असतं कारण जसं आपण मोठे होतो तसे आपण बदलतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज आहे आणि मला वाटलं की हा (घटस्फोट) मला आनंद देईल आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर त्यामुळे मी खूप आनंदी झालो आहे. हा एक सुखद घटस्फोट आहे.’

किरण रावनं सांगितलं की आमिर आधी ती बराच काळ सिंगल होती आणि माझ्या स्वातंत्र्याचा आनंद घेत होती. तिनं पुढे सांगितलं की तिला एकटेपणा वाटायचा, पण आता मुलगा आजादमुळए तिला असं वाटत नाही. याविषयी सांगत किरण राव पुढे म्हणाली, ‘मला वाटतं की एकटेपणाच एकमेव अशी गोष्ट आहे ज्याविषयी लो

कांना थोडी चिंता असते.

जेव्हा त्यांचा घटस्फोट होतो किंवा त्यांच्या साथीदाराला गमावतात. मला मुळीच एकटेपणा जाणवला नाही. खरंतर, त्याच्या कुटुंबाचा आणि माझ्या कुटुंबाचा असा मला दोन्ही कुटुंबांचा पाठिंबा मिळातो. त्यामुळे त्यानंतर फक्त चांगल्या गोष्टीच सुरु आहेत. हा एक खूप सुखद अर्थात Happy Divorce होता.’

किरण रावनं पुढे सांगितलं की आमिर आणि तिच्यातलं प्रेम कमी झालेलं नाही. त्याविषयी सविस्तर बोलत किरण राव म्हणाली, ‘या नात्यात खूप प्रेमस खूप सन्मान, खूप मोठा इतिहास, आनंद-मस्करी, विचारसरणी, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही एकमेकांनमध्ये शोधतो. त्यामुळे मला या सगळ्या गमवायच्या नाही. हे बोलणं योग्य ठरेल की आम्ही विवाहीत आहोत, हे बोलण्यासाठी आम्हाला कागदाची गरज नाही, पण आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहोत. घटस्फोटानंतरही काळाच्या कसोटीवर टिकणारी ही भागीदारी आहे.’

हेही वाचा :

कधीपर्यंत साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणार धर्मवीर २ वरून केदार दिघेचा शिंदेंना सवाल

जीममध्ये व्यायाम करतानाच काही सेकंदात गेला जीव; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

इचलकरंजीत पाणी नागरी वस्तीच्या दिशेने; शहरातील जुना पूल वाहतुकीस बंद