दोन दिग्गज कंपन्यांचे लवकरच येणार आयपीओ
मुंबई : सध्या भारतीय शेअर बाजारात होत असलेली उलाढाल पाहून अनेक कंपन्या(IPO) आपले आयपीओ घेऊन येत आहेत. आयपीओच्या माध्यमातून अशा अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या आणखी दोन कंपन्या लवकरच आपला आयपीओ घेऊन येणार असून त्यासाठीची प्रक्रिया चालू आहे.
स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेज आणि ईकॉम एक्स्प्रेस (IPO)अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीकडे या दोन्ही कंपन्यांनी आपले आयपीओस बाजार नियामक सेबी के पास ड्राफ्ट (डीआरएचपी) केले आहेत.
सेबीकडे जमा केलेल्या ड्राफ्टनुसार स्मार्टवर्क्स कोवर्किंग स्पेसेज ही कंपनी आपीओच्या माध्यमातून भांडवली बाजारातून पैसे उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ही कंपी नवे शेअर्स (फ्रेश शेअर्स) जारी करून आईपीओच्या मदतीने 550 कोटी रुपये जमा करणार आहे.
यासह या कंपनीचे प्रमोटर असलेल्या एनएस निकेतन अँड एसएनएस इंफ्रारियल्टी आणि इन्वेस्टर स्पेस सोल्यूशन्स इंडिया ऑफर फोर सेलच्या माध्यमातून आपली हिस्सेदारी कमी करणार आहेत. प्रमोटर्स आणि इन्व्हेस्टर्स मिळून ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून 67,59,480 विकणार आहेत. हा आयपीओ नेमका किती मोठा असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
बी2सी ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स सॉल्यूशन प्रोव्हाईडर फर्म ईकॉम एक्सप्रेसचाही लवकरच आयपीओ येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 2,600 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओत 1,284.5 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स तर 1,315.5 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यातून विकले जाणार आहेत. ही कंपनी प्री-आईपीओ प्लेसमेंटच्या माध्यमातून 256.9 कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. सेबीच्या मंजुरीनंतरच या दोन्ही आयपीओंत सामान्यांना गुंतवणूक करता येईल .
(टीप– शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
“नवाब सैफ अली खान तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत?”
‘ही’ विमान कंपनी 1000 हून अधिक महिला पायलट भरती करणार
आमदारकीसाठी शड्डू ठोकलेल्या समरजित घाटगेंना कागलमध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार