नाशिकमधील भोंदू अशोक खरातची अनेक काळे कृत्य समोर आली आहेत.(water) लैंगिक अत्याचार व कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याची आज पोलीस कोठडी संपली असून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत असताना एसआयटीनं त्याच्याकडून अजून माहिती मिळवली असून त्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.भविष्य व ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली शाकाहारी व जैन धर्मीयांना मासे खाण्याचा सल्ला द्यायचा. नुसता सल्लाच नाही तर त्याने त्यांना मासे खायायला सुद्धा दिल्याची माहिती उघड झाली आहे. मासा ‘पाण्यातली वनस्पती’ असल्याचे सांगून तो त्यांना मासे खाण्यास भाग पडत. लोकांना फसवण्यासाठी खरात वेगवेगळ्या युक्त्या वापरायचा. कोणाला मध, तर नाग देवतेची भीती घालायचा. महिलांना गुंगीचं औषध देून त्यांच्याव र अत्याचार करायचा.

आता खरातचा असा प्रकार उघडकीस आलाय जो ऐकून अनेकांना (water) धक्का बसलाय. मासा हा पाण्यातली वनस्पती आहे, असं सांगून खरातने अनेक शाकाहारी लोकांना प्रसाद म्हणून मासा खाण्यास सांगायचा. मासा कापला त्याला तर रक्त येत नाही. माश्यामध्ये हाडं नसतात. मासे तर पाण्यातली वनस्पती, आहेत, असं ब्रह्मज्ञान खरात पाजळायचा. खरातने काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवलं असून त्यांना मासे खायायला लावली. त्यांच्याकडून लाखो रूपयांची रक्कम लुबाडली आहे.
भोंदू अशोक खरात केवळ काही लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरायचा. (water) खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे, मात्र फक्त १२ कोटींचे उत्पन्न दाखवून तो त्याचा आयकर भरायचा. आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील संशय आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून अशोक खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.खरातचे राजकीय नेत्यांची हितसंबंध होते, हे समारे आले असतानाच, आता याप्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. यासह अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वऱ्हाडींचा शोध घेतला जाणार आहे. सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यात हजर होते, अशी माहिती SIT कडे आहे.
हेही वाचा :
गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना खूप त्रासदायक झाल्यात? तर हा घरगुती लेप लावा
या देशांकडे आहे जगात सर्वात खतरनाक नौदल, भारताचे स्थान कितवे ?
चेन्नई सुपर किंग्सबाबत रवींद्र जडेजाला अजूनही तितकंच प्रेम, व्हायरल फोटो तु्म्हीही व्हाल भावुक