10 ग्रॅम सोन्यासाठी आता मोजा फक्त ‘इतके’ रुपये
आज 31 ऑगस्टरोजी महिन्याच्या शेवटच्या (gold)दिवशी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या या काळात मौल्यवान धातूमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यापासून सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरु असताना गेल्या दोन दिवसांत सोन्यात किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे तोळ्यामागे आता ग्राहकांना किती रुपये द्यावे लागतील? 10 ग्रॅमचा भाव काय?, ते जाणून घेऊयात.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आता 22 कॅरेट (gold)सोन्याच्या एका तोळ्याला ग्राहकांना 76,831 रुपये द्यावे लागतील. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सध्या 65,872 रुपये झाली आहे. तसेच, 24 कॅरेट सोनं सध्या तोळ्यामागे 83,816 रुपये असून दहा ग्रॅमसाठी 71,860 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.
ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी, सोन्याच्या किंमतीत केवळ 90 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदीने देखील दिलासा दिला आहे. एक तोळा चांदीसाठी सध्या ग्राहकांना 992 रुपये मोजावे लागत आहेत.तर, दहा ग्रॅम चांदीचा भाव 851 रुपये झाला आहे. आज चांदीमध्ये 510 रुपयांची घसरण झाली.
महाराष्ट्रात काय आहेत सोने-चांदीचे दर?
मुंबई 71,730 रुपये (10gm) तर चांदी 84,920 (kg)आहे.
पुणे 71,730 रुपये (10gm) तर चांदी 84,920 (kg)
नाशिक 71,730 रुपये (10gm) तर चांदी 84,920 (kg)
औरंगाबाद71,730 रुपये (10gm) तर चांदी 84,920(kg)
नागपूर 71,730 रुपये (10gm) तर चांदी 84,920 (kg)
दरम्यान,वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
हेही वाचा:
वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?
सलमान खानलाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भुरळ, Viral Video
‘सॉरी आई, मी तुला मारलं’, पोटच्या लेकानेच जन्मदातीला संपवलं, नंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली