बीएसएनएलच्या ‘या’ प्लॅननी उडवली Jio, Airtel ची झोप
बीएसएनएलचं(BSNL) सिमकार्ड वापरणाऱ्यांची आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्व लोकांचे लक्ष हे बीएसएनएलकडे लागले होते. कारण बीएसएनएल कंपनी वेळोवेळी आपल्या प्लॅनमध्ये बदल करत असते. जेणेकरून वापरकर्ते बीएसएनएल प्लॅन खरेदी करू शकतील. अशातच आता BSNL ने एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये कंपनीने अनेक फीचर्स दिले आहेत, जे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा वेगळे आहेत.
नुकताच बीएसएनएल(BSNL) कंपनीने 997 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 160 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. म्हणजेच तुम्ही हा प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला सुमारे 5 महिन्यांसाठी रिचार्जपासून सुटका मिळणार आहे.
याशिवाय कंपनीने या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील दिले आहेत. यासोबतच तुम्हाला प्लॅनमध्ये इतरही अनेक फायदे दिले आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला WOW Entertainment, BSNL Tunes, Zing Music चे देखील सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
ग्राहकांसाठी बीएसएनएलने सेल्फ केअर ॲप देखील दिले आहे. रिचार्ज करण्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी ॲप वापरू शकता. दीर्घ मुदतीच्या व्हॅलिडिटीसह परवडणाऱ्या योजनांच्या लिस्टमध्ये या प्लॅनचा समावेश आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्लॅन सर्व BSNL धारकांसाठी उपलब्ध आहे.
सध्या BSNL कंपनी 4G आणि 5G नेटवर्कवर काम करत आहे. अशातच आता 25 हजार साईट्सवर 4G सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच ही सरकारी कंपनी लवकरच 1 लाख साईट्सवर आणण्याचे काम करत आहे. अशास्थितीत कंपनीने लाँच केलेला हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय ज्या ग्राहकांना जास्त दिवसांचा रिचाज प्लॅन करायचा असेल किंवा अनलिमिटेड डेटा हवा असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वात बेस्ट ठरणार आहे.
हेही वाचा:
“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात…; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
तुम्ही लवकर उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रियाताईंनी दादांच्या डायलॉगचा घेतला समाचार