एअरटेलने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! सर्वात स्वस्त प्लॅन लाँच

भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी या वर्षी जुलै महिन्यापासून रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यानंतर एअरटेलने त्यांचे अनेक जुने प्लॅन्स त्यांच्या लिस्टमधून काढून टाकले आहेत आणि अनेक नवीन प्लॅन लाँच(launched) केले आहेत. दरम्यान आता भारती एअरटेल कंपनीने ग्राहकांना एक दिवाळी गिफ्ट दिलं आहे. ज्यामध्ये कंपनीने 26 रुपयांचा स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे..

एअरटेलच्या या नवीन प्लॅनची किंमत 26 रुपये आहे. कंपनीने हा प्लॅन फक्त डेटा पॅकसाठी लॉन्च(launched) केला आहे. अनेक वेळा दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत वापरकर्ते डेटा ॲडऑन पॅक रिचार्ज करतात. अशा यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एअरटेलने एक नवीन प्लान लॉन्च केला आहे, ज्याची किंमत फक्त 26 रुपये आहे.

या प्लॅनमध्ये यूजर्सना 1.5GB डेटा मिळतो.हा डेटा केवळ एका दिवसाच्या वैधतेसह येत आहे. एअरटेल कंपनी यापूर्वी 22 रुपयांचा डेटा ॲडऑन प्लॅन ऑफर करत होती, ज्यामध्ये 1 जीबी डेटा मिळत होता. पण हा प्लॅन केवळ एका दिवसाच्या वैधतेसह आला होता.

एअरटेलच्या बिग डेटा ॲडऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर कंपनी 77 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB डेटा देत आहे. तर 121 रुपयांच्या डेटा ॲडऑन प्लॅनमध्ये 6GB डेटा उपलब्ध आहे. एअरटेल प्रमाणे, रिलायन्स जिओ देखील आपल्या वापरकर्त्यांना अशा अनेक डेटा ॲडऑन प्लॅन देत आहे.

मात्र या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर भारताची सरकारी दूरसंचार कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ला वेगाने वाढ करण्याची मोठी संधी मिळाली आहे. यामुळेच BSNL कंपनी केवळ 4G नेटवर्कसह 5G आणण्याची वेगाने तयारी करत आहे.

हेही वाचा:

निवडणुका रद्द होणार आधीच माहिती होतं; अमित ठाकरेंचं विधान!

महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार

निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?