नागरिकांनो ‘या’ व्हिडिओंना लाईक कराल तर थेट होणार पोलीस चौकशी!

आजकाल सर्वत्र सोशल मीडियाची(social media) क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण तरुणवर्ग सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अन् रिल्सच्या माध्यमातून समोर येत असतात. तसेच त्या व्हिडिओ अन् रिल्सला लाईक करणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड आहे. परंतु आता पुणे पोलीस आयुक्तांनी एक महत्वाचा आदेश काढला आहे. त्यानुसार अशा काही व्हिडिओला लाईक केलं तर थेट तुमची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

आजकाल दहशत माजवणाऱ्या गुंडांकडून सोशल मीडियावर(social media) व्हिडिओ प्रसारीत केले जातात. या व्हिडिओंना लाईक करुन त्यांचे प्रस्थ वाढवणाऱ्यांवर आता थेट पोलिसांची कडक नजर असणार आहे. यामुळे आता सोशल मीडियावर व्हिडिओला लाईक करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

गेलूया काही दिवसांपासून पुण्यात गुंडाच्या दहशदींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता या विरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुन्हा एकदा अँक्शन मोडवर आले आहेत. दहशत माजवण्यासाठी सोशल मीडियावर गुन्हेगारांकडून विविध व्हिडिओ प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे आता पुणे पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारचे रील प्रसारित करणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्याचे थेट आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले आहेत.

पुणे पोलिसांच्या नव्या आदेशानुसार आता व्हिडिओला लाइक देणाऱ्यांची देखील चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे. तसेच वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, शहरात कोयते उगारून दहशत माजवणे, तसेच सोशल मीडियावर ‘स्टेटस’वर इतर प्रकारच्या शस्त्रांचे फोटो प्रसारित करण्याच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अशाप्रकारच्या व्हिडिओंना लाईक कराल तर तुमच्याही अंगलट येण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात वाढत असलेली गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी हे पाऊले उचलली आहेत. तसेच समाजात हिरो म्हणून वावरणाऱ्या गुंडाच्या प्रत्येक हालचालींवर देखील आता पोलिसांचे लक्ष असणार आहे. तसेच सराईत गुंडांवर आणि सोशल मीडियावर पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे.

हेही वाचा:

अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील…; आमदार बच्चू कडूंचे मोठे विधान

‘मूर्ख तू नाहीस, तर मी आहे,’ …अन् संतापलेल्या धोनीने घातल्या शिव्या

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर