नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार चालना!
लग्न मग ते घरचे असो की पाहुण्यांच्या येथील असो लग्न(marriage) समारंभ हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातच लग्न म्हटले की मोठ्या प्रमाणात खर्च हा आलाच. त्यातून डेकोरेशनसह, फुड क्षेत्रासह अनेक घटकांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो. हीच बाब लक्षात घेता येत्या काही दिवसांमध्ये लग्नाचा सीजन सुरु होणार असल्याने, त्यातून मोठी उलाढाल होणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अर्थात येत्या आठवड्यापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीनंतर लगेचच बिग बँग वेडिंग सीझन सुरू होणार आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनपेक्षित चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या दोन महिन्यांमध्ये 48 लाख विवाह सोहळ्यांमधून 5.9 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे. विशेष म्हणजे या काळात एकट्या दिल्लीत 4.5 लाख विवाह होणे अपेक्षित आहे. यातून राजधानी दिल्ली परिसरात दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.
पुढील महिन्यात १२ नोव्हेंबरपासून लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) केलेल्या अभ्यासानुसार, देशातील किरकोळ क्षेत्र (ज्यात वस्तू आणि सेवा दोन्ही समाविष्ट आहेत) या लग्नाच्या हंगामात 5.9 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे. देशभरात अंदाजे 48 लाख विवाह सोहळ्यांसह, हा हंगाम आर्थिक वाढीचा एक मोठा टप्पा असेल. गेल्या वर्षी 35 लाख विवाहांसह एकूण व्यवसाय 4.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.
विवाह प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये होतो. परंतु, प्रत्येकजण समान खर्च करत नाही. काही लग्नांमध्ये(marriage) कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तर काही ठिकाणी लग्न हे केवळ दोन-तीन लाख रुपयांमध्ये उरकले जातात. सीएआयटी नुसार, यावर्षी बहुतेक लग्नांना 3 ते 15 लाख रुपये खर्च आला आहे. तर जवळपास सात लाख लग्न अशी होती ज्यामध्ये 25 लाख रुपये खर्च केले गेले. याशिवाय 50-50 हजार लग्न अशी होती, ज्यामध्ये 50 लाख रुपये आणि 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला गेला.
लग्न खर्च होणारी प्रमुख क्षेत्रे
– कपडे, साड्या, लेहेंगा आणि पोशाख (10 टक्के)
– दागिने (15 टक्के)
– इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि ग्राहक टिकाऊ वस्तू (5 टक्के)
– सुका मेवा, मिठाई आणि स्नॅक्स (5 टक्के)
– किराणा आणि भाजीपाला (५ टक्के)
– भेट वस्तू (4 टक्के)
– इतर वस्तू (6 टक्के)
सेवा क्षेत्रातही होतो भरपूर खर्च
– बँक्वेट हॉल, हॉटेल्स आणि लग्न स्थळे (5 टक्के)
– इव्हेंट मॅनेजमेंट (5 टक्के)
– मंडप सजावट (12 टक्के)
– खानपान सेवा (10 टक्के)
– फुलांची सजावट (4 टक्के)
– वाहतूक आणि कॅब सेवा (3 टक्के)
– फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी (2 टक्के)
– ऑर्केस्ट्रा आणि बँड (3 टक्के)
– प्रकाश आणि आवाज (3 टक्के)
– इतर सेवा (3 टक्के)
हेही वाचा :
अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी!
‘दिलबर, दिलबर…’ गाण्यावर कंबर लचकवत मुलाचा बेली डान्स Video
राज्यात शिक्षक पदांची निर्मित्ती, कोतवालांचं मानधन वाढवलं; मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय