1 लाख महिला व बालकांना मिळणार मोफत उपचार, नीता अंबानी यांची घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे(reliance industries) चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असून, त्यांच्या पत्नी नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आहेत. या माध्यमातून त्या समाजकारणासाठी महत्त्वाचे काम करत असतात. या मालिकेत, रिलायन्स फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, नीता अंबानी यांनी एक मोठा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामुळे देशातील महिला, लहान मुले यांना मोठा फायदा होणार आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या(reliance industries) या सामाजिक उपक्रमाद्वारे लहान मुले, किशोरवयीन आणि महिलांसाठी मोफत चाचणी आणि उपचार सुविधा पुरविल्या जातील. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त नीता अंबानी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी एक लाखाहून अधिक महिलांना मोफत चाचणी आणि उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे.

सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन आरोग्य सेवा योजनेचा भाग म्हणून उपेक्षित समाजातील मुलांसाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये एक लाख महिलांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा समावेश आहे. याशिवाय या उपक्रमांतर्गत पुढील सेवा दिल्या जाणार आहेत.

– जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त 50,000 बालकांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे.

– 50,000 महिलांसाठी स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहे.

– 10,000 तरुण किशोरवयीन मुलींसाठी मोफत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे लसीकरण केले जाणार आहे.

सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल 10 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता मुकेश अंबानी यांनी उपेक्षित समुदायातील 1,00,000 हून अधिक मुले आणि महिलांना मदत करण्यासाठी नवीन आरोग्य सेवा योजना जाहीर केली आहे.

“आम्ही मिळून रिलायन्स फाऊंडेशनचे दशक जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा, प्रगत उपचारांसह साजरे करत आहोत. कारण आम्ही भारताचे आरोग्यदायी, उज्वल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन 10 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. रुग्णालयाला जागतिक दर्जाचे बनवण्याचे आमचे ध्येय, आम्ही लिलया पुढे नेले आहे आणि एकत्रितपणे आम्ही लाखो जीवन सुधारले आहे आणि असंख्य कुटुंबांना जगण्याची उमेद दिली आहे. असेही नीता अंबानी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!

निवडणूक जिंकली, तरीही CMपद जाणार; शिंदेंना धक्का? महाशक्तीचा नवा फॉर्म्युला ठरला

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘या’ चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार!