अदानी समूहाचा मोठा करार, ही कंपनी विकत घेण्याची घोषणा; खुली ऑफरही जाहीर!
अदानी समूहाची (adani group)कंपनी रीन्यू एक्झिम डीएमसीसी ने आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेड मधील 46.64 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी करार जाहीर केला आहे. इटालियन-थाई डेव्हलपमेंट पब्लिक कंपनी लिमिटेडकडून हा हिस्सा अदानी समूहाची कंपनी खरेदी करणार आहे.
रीन्यू एक्झिम डीएमसीसीने हा हिस्सा 400 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेण्याचा करार केला आहे. यासाठी कंपनीला 3204 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. या कराराद्वारे अदानी समूह(adani group) आपली अभियांत्रिकी क्षमता वाढवत आहे. विमानतळ, महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी हे आवश्यक आहे.
रीन्यू एक्झिम डीएमसीसीने अतिरिक्त 26 टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी खुली ऑफर जाहीर केली आहे. कंपनी सार्वजनिक भागधारकांकडून 571.68 रुपये प्रति शेअर दराने खरेदी करेल. ही ओपन ऑफर पूर्णपणे सबस्क्राइब झाली तर कंपनी 2553 कोटी रुपये खर्च करेल. खुल्या ऑफरची किंमत शुक्रवारच्या 539 रुपयांच्या बंद होण्याच्या तुलनेत 6 टक्के जास्त आहे.
आयटीडी सिमेंटेशनच्या शेअरच्या किमती गेल्या एका वर्षात 180 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 44 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 9,152.84 कोटी रुपये आहे. शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 694.45 रुपये आणि 52 आठवड्यांची निम्न पातळी 188.20 रुपये आहे.
जुलै 2024 मध्ये आयटीडी सिमेंटेशनने म्हटले होते की त्यांचे प्रवर्तक भागविक्रीची शक्यता शोधत आहेत. या करारानंतर अदानी समूहाचे कंपनीवर नियंत्रण राहणार आहे. रीन्यू एक्झिमच्या पोर्टफोलिओमध्ये दिल्ली मेट्रो आणि कोलकाता मेट्रोच्या कामाचा समावेश आहे.
हेही वाचा :
दृश्यम चित्रपट पाहून हाय प्रोफाईल महिलेची हत्या अन्
1 लाख महिला व बालकांना मिळणार मोफत उपचार, नीता अंबानी यांची घोषणा
‘या’ प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारचा मित्रासोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल!