विधानसभा निवडणुकीपूर्वीच ‘या’ बड्या पक्षाने दिला स्वबळावर लढण्याचा इशारा

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा(politics) निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यात समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत. कमी करून 5 जागांपर्यंत वाटा खाली आणला तरीही महाविकास आघाडीकडून अजूनही या जागा दिल्या जात नसल्याने समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव चांगलेच संतापले आहेत. ‘लवकरात लवकर आम्हाला जागा द्या, अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे मैदानात उतरू’, असा इशाराच महाविकास आघाडीला दिला आहे.

समाजवादी पक्षाने दावा केलेल्या पाच जागांपैकी महाआघाडीने 3 जागांवर आपले उमेदवार(politics) उभे केले आहेत. सपाने धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य या जागा मागितल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी धुळे शहरातून अनिल कोते यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेसने मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम यांना उमेदवारी दिली आहे.

अखिलेश यादव यांना इंडिया आघाडीअंतर्गत महाराष्ट्रात सपासाठी काही जागा हव्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. राजकारणात बलिदानाला कुठेही स्थान नसते. तथापि, आधी आमचा प्रयत्न आघाडीत राहण्याचाच असेल, परंतु त्यांच्याकडूनच आम्हाला ठेवले जाणार नसेल तर जेथे आमच्या पक्षाची ताकद आहे.

समाजवादी पक्ष हा प्रामुख्याने उत्तर प्रदेशात असल्याचे पाहिला मिळत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता. समाजवादी पक्षाची स्थापना 4 ऑक्टोबर 1992 रोजी मुलायम सिंह यादव यांनी केली आणि ती उत्तर प्रदेशमध्ये आहे. समाजवादी पक्ष समतेच्या तत्त्वावर काम करणारा समाजवादी समाज निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो.

हेही वाचा :

“मी माझ्या शेवटच्या काही वर्षात…” IPL पूर्वी महेंद्रसिंग धोनीचं विधान

सुपरस्टार थलपती विजय होणार तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री!

राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्का