गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त
ऐन दिवाळीच्या धामधुमीत मौल्यवान धातूने आघाडी घेतली होती. मात्र, आता दिवाळी सरताच या धातुचा आणि सराफा बाजाराचा उत्साह ओसरला आहे. मौल्यवान धातुत मोठी घसरण दिसून येत आहे. दिवाळीमध्ये सोनं(gold) मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं. मात्र, या दिवाळीत ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली. आता दिवाळी सरताच सोनं स्वस्त झालं आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना गुड न्यूज मिळाली आहे.
मागच्या आठवड्यात सोन्यात(gold) 2 हजारांची वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला भावात मोठा बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मात्र घसरणीचे सत्र दिसून आले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,055 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर, चांदीमध्ये मागील आठवड्याच्या शेवटी 3 हजारांची घसरण झाली होती. सध्या चांदीच्या किमती या स्थिर आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये इतका आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,518, 23 कॅरेट 78,204, 22 कॅरेट सोने 71,923 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 58,889 रुपये, 14 कॅरेट सोने 45,933 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
भाजपला मोठा धक्का ! राष्ट्रीय प्रवक्त्यानेच दिला राजीनामा
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..