सकाळी नाश्त्यात बनवा प्रोटीनयुक्त मसाला फ्रेंच टोस्ट, लगेच नोट करा रेसिपी

कधी कधी सकाळी कामाला उशीर होत असेल तेव्हा नाश्त्यात काय बनवायचं हे सुचत नाही.(running)पण काळजी करु नका. पुढे दिलेली मसाला फ्रेंच टोस्टची रेसिपी लगेच लिहून घ्या. ही प्रोटीनयुक्त रेसिपी तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडेल.अंडी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, दूध किंवा पाणी, ब्रेड

कृती
एक वाटीत बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची,हळद, मीठ, कोथिंबीर आणि दूध किंवा पाणी घालून फेटून घ्या. त्यात अंडी फोडा आणि पुन्हा सगळं एकत्र फेटा.आता ब्रेडचे त्रिकोणी काप करा किंवा एक आख्खा ब्रेड तसाच या मिश्रणात बुडवून दोन्ही बाजूने सगळं मिश्रण लावून घ्या. (running)नंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यावर थोडा तेल लावून घ्या.

आता मिश्रणात बुडवलेले ब्रेडचे काप त्यावर भाजायला ठेवा. त्यावर अजून मिश्रण घालून व्यवस्थित पसवरून घ्या. मध्यम आचेवर भाजून थोड्यावेळाने ब्रेड पलटी करा आणि दुसरी बाजू सुद्धा भाजून घ्या. (running)असे बाकीचे ब्रेडसुद्धा भाजून घ्या. गरमगरम मसाला फ्रेंच टोस्ट तयार आहेत. आता हिरवी चटणी किंवा केचअप सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

भाजप नेत्याचा ‘तो’ VIDEO व्हायरल, कार्यालयातच महिलेच्या मिठीत पडून..

‘तुझा नंबर दे… सेक्सी दिसतेस’, सुदेश म्हशीलकरचा मराठी अभिनेत्रीला अश्लील मेसेज

आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण