पावसाळा ऋतूला सगळीकडे सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये सगळीकडे थंडगार वातावरण असते. (Soup )थंड वातावरणात सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. कधी गरमागरम कांदाभजी बनवली जाते तर कधी विकत आणलेले सूप प्याले जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर विकत मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. कारण या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर शरीराला लागण होते. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये घरात बनवलेल्या सूपचे सेवन करावे. कारण सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. थंड वातावरणात गरमागरम सूप प्यायल्यामुळे सर्दी खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. म्हणूनच आज आज आम्ही तुम्हाला क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप चवीला अतिशय सुंदर लागते.
साहित्य:
- मशरूम
- कांदा
- लसूण
- क्रीम
- मीठ
- बटर
- आलं
- कोथिंबीर
- काळीमिरी(Soup ) पावडर
- दूध
- लिंबाचा रस
कृती:
- क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, मशरूमवरील साल काढून स्वच्छ धुवून घ्या आणि मशरूमचे मध्यम तुकडे करा.
- पॅनमध्ये बटर घालून त्यात आलं, (Soup )लसूण, कांदा आणि कोथिंबिरीच्या काड्या घालून परतवून घ्या.
- त्यानंतर त्यात मशरूम आणि काळीमिरी पावडर टाकून शिजवून घ्या. शिजवून थंड झालेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
- पॅनमध्ये पुन्हा एकदा बटर टाकून त्यात थोडासा मैदा घालून मिक्स करा आणि दूध टाका. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यात भाजून घेतलेले मश्रूम आणि तयार केलेली पेस्ट टाकून मिक्स करा.
- सूप बनवताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करू करा. नंतर त्यात काळीमिरी पावडर, मीठ आणि क्रीम घालून मिक्स करून घ्या.
- तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले क्रिम गार्लिक मशरूम सूप.
हेही वाचा :