आयपीएल 2025 मध्ये टॉप 2 मध्ये कोण जाणार? जाणून घ्या अंतिम समीकरण

IPL 2025 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या चार संघांची घोषणा झाली आहे.(announced) गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. मात्र, अजूनही टॉप 2 मध्ये कोणते दोन संघ जाणार, हे ठरलेलं नाही.IPL प्लेऑफमध्ये टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना थेट फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात. तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना एलिमिनेटर खेळून पुढे वाटचाल करावी लागते. त्यामुळे आज 26 मे होणाऱ्या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.

आजचा एक सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याचा विजेता थेट क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश करेल, म्हणजे टॉप 2 मध्ये स्थान पटकावेल. दुसरीकडे, पराभव झालेल्या संघाला एलिमिनेटरमध्ये खेळावं लागेल, ज्यामुळे त्यांची फायनल गाठण्याची वाट अधिक कठीण होईल.गुजरात टायटन्स सध्या 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. मात्र त्यांचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत. (announced)त्यामुळे अन्य संघांचे शेवटचे सामने आणि त्याचे निकालच गुजरातचं टॉप 2 स्थान निश्चित करतील.

दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. आरसीबीने हा सामना जिंकला, तर ते टॉप 2 मध्ये स्थान मिळवतील आणि गुजरात टायटन्स एलिमिनेटरमध्ये खेळतील. मात्र, जर लखनऊने विजय मिळवला, तर गुजरातचं टॉप 2 स्थान निश्चित होईल आणि आरसीबीला एलिमिनेटर खेळावा लागेल.(announced)या सर्व घडामोडींमुळे आजचे दोन्ही सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. IPL 2025 च्या अंतिम चार संघांची नावे निश्चित झाली असली, तरी फायनलच्या शर्यतीसाठी कोणाला दोन संधी मिळणार आणि कोण थेट एलिमिनेटरमध्ये उतरणार, हे आज रात्री निश्चित होईल.

हेही वाचा :

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेता भाजपच्या वाट्यावर

‘त्याने माझ्याकडे पाहून पँटची चैन उघडली अन्…’; अभिनेत्रीसोबत मुंबईच्या रस्त्यावर घडला विचित्र प्रकार

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission