कोल्हापूरात राज्य उत्पादक विभागाची मोठी कारवाई !
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराने जोर पकडला आहे. अवघे काहीच दिवस निवडणुकीच्या मतदानासाठी शिल्लक असल्याने सभा, रॅली, मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन(production) शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे यांनी दिली आहे.
कोल्हापूर राज्य उत्पादन(production) शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर- नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका महिंद्रा सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.
या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली असता काल दिनांक 10 नोव्हेंबर रोजी एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची जेनिओ रजि.क्र. MH-07-P-4755 येत असलेली दिसली. या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले विविध ब्रँडचे 180, 500 तसेच 750 मिलीचे एकुण 151 बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी प्रसाद महादेव नराम मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग या व्यक्तीस अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या गाडीत मध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला. अटक केलेल्या व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भातील पुढील तपास सुरु आहे.
दि. 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली यानंतर आजपर्यंत शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 493 कोटी 46 लाख रुपंयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादींची समावेश आहे.
सी- व्हिजिल ॲप हे आचारसंहिता भंगासंबंधी तक्रार करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. राज्यातील सजग नागरिकांनी हे सी-व्हिजिल ॲप (C-Vigil app) डाऊनलोड करावे. या ॲपद्वारे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग झाला असेल तर त्याची तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा :
Jio, Airtel आणि VI च टेन्शन वाढलं! स्टारलिंकची लाँचिंग डेट जवळ
हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?
शुटिंग दरम्यान, सेटवरच बाटलीत लघवी करायचा अभिनेता