आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!
दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे(zodiac signs) तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य(zodiac signs) तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज 26 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. मंगळवारी एकादशी तिथी रात्री 3 वाजून 48 मिनिटांपर्यंत राहील. तसेच 2 वाजून 14 मिनिटांपर्यंत प्रीती योग जुळून येईल.याशिवाय आज कृष्ण पक्षातील एकादशी आहे, तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केली जाते.
मेष राशी : आज कुणाचेही ऐकून निर्णय घेऊ नका. तुमचे जवळचे लोकच तुमचा विश्वास तोडू शकतात. नोकरीच्या बाबतीत गाफील राहू नका. जवळचा मित्र प्रमोशनमध्ये अडथळा ठरू शकतो. नवीन सुरुवात करत असाल तर कुणालाही काहीही सांगू नका. तुमचं काम करत राहा, यश नक्की मिळेल.
वृषभ राशी : आज तुमच्या व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. आज तुमचे मोठे वाद होऊ शकतात. त्यामुळे बोलताना शब्द जरा जपून वापरा. अनावश्यक वाद होतील तितके टाळा. अन्यथा, मोठं नुकसान होऊ शकतं.
मिथुन राशी : उद्योग धंद्यात काही अडथळे आल्यानंतर व्यवसायात यश मिळेल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते.
कर्क राशी : तुमचे कौशल्य पणाला लावा. नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. आज अचानक धनलाभ संभवतो.
हेही वाचा :
बिडी न दिल्यामुळे थेट जिवलगावरच चाकूने हल्ला…
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा
चिन्ह गोंधळाचा फटका पिपाणीने तुतारीसारखी वाजवली बाजी शरद पवार गटाचे 9 उमेदवार पराभूत