IPL सोडा, मलायकाच्या लेकाचा सावत्र आईसोबतचा क्रिकेट सामना पाहा!

मुंबई- मलायका अरोरा आणि अरबाज खान(actor) यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. पण ते आपल्या मुलासाठी बरेचदा एकत्र स्पॉट होत असतात. तो बरेचदा आपल्या आईसोबत वेळ घालवताना दिसतो. पण सोबतच तो खान कुटुंबासोबतही मजा मस्ती करत असतो.

अऱहानचे त्याच्या सावत्र आईशी खूप छान बॉण्डिंग आहे. नुकताच त्याचा आई सावत्र आई शूराचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो तिच्यासोबत क्रिकेट खेळत आहे. ती पण त्याच्यासोबत अगदी लहान होऊन खेळतेय. ही क्लिप पाहून चाहतेही आश्चर्यचकित होऊन आनंद व्यक्त करत आहेत.

एकीकडे मलायका अरोरा(actor) तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे तिचा मुलगा अरहान त्याच्या वडिलांची म्हणजेच अरबाज खानची दुसरी पत्नी शूरा खानसोबत चांगला वेळ घालवत आहे. दोघेही घराच्या पार्किंगमध्ये क्रिकेट खेळत होते. शूरा बॉलिंग करत होती. तर अरहान बॅटिंग करत होती. नंतर अरहान बॉलिंग करु लागला अन् शूरा बॅटिंग करु लागली.

शूरा ही अरहानची सावत्र आई असली तरी त्यांच्यात खूप गोड नाते आहे. मलायकाचा मुलगा अरबाजच्या दुसऱ्या लग्नात आनंदाने सहभागी झाला होता. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘ते हुबेहूब टॉम अँड जेरीसारखे दिसतात, जे एका छोट्या मैदानात क्रिकेट खेळत असतात.’ एकाने सांगितले, ‘मला आयपीएलपेक्षा हा क्रिकेट सामना बघण्यात जास्त मजा येत आहे.’ एकाने लिहिले, ‘मलायका हे बघून बोलत असेल, हा काय मुलगा आहे.’

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९७ मध्ये लग्न केले आणि २००२ मध्ये त्यांचा मुलगा अरहान खानचा जन्म झाला. साधारण १९ वर्ष संसार केल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अरबाज खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शूरा खानशी लग्न केले होते. एका महिन्यानंतर त्यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण होईल. अरहानच्या २२ व्या वाढदिवसानिमित्त शूराने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता, तसेच त्याला शुभेच्छा देताना, ‘माझ्या मित्राला, माझ्या कुटुंबियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू जसा आहे त्यासाठी खूप धन्यवाद असे लिहिले.

हेही वाचा :

MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला

सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदांती बातमी! सोन्या – चांदीच्या किंमतीत घसरण

आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!