70 पुरुषांसमोर शॉर्ट ड्रेस, कट बोलल्यानंतरही किस केला
बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ताने चित्रपटातील इंटिमेट(talking)सीन्समध्ये तिच्यासोबत घडलेली घटना सांगितला आहे. नेमकं ती काय बोली जाणून घ्या.बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत. एका मिडिया मुलाखतीत तिने चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट केले जातात याचा खुलासा केला.सयानीने मुलाखतीत सांगितले की, “बदलत्या काळानुसार अनेक गोष्टीत सुधारणा होते. आता इंटिमेट सीन किंवा बोल्ड सीन शूट करताना सेटवर एक इंटिमेसी कोऑर्डिनेटर आणि डायरेक्टर असतात. तेथे अगदी प्रोफेशनल पद्धतीने शूट केले जाते. परंतु बरेच लोक याचा फायदा देखील घेतात.”
‘चार मोअर शॉट्स’च्या दरम्यानचा एक किस्सा तिने सांगितला. यात तिने सेटवरील सुरक्षेबद्दल बोली आहे. सयानी म्हणाली की, “मला समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर शॉर्ट ड्रेसमध्ये झोपावे लागले आणि माझ्यासमोर क्रूसह जवळपास 70 लोक होते. त्यावेळी मला खूप असुरक्षित वाटत होते. सेटवर माझ्या जवळ एकही माणूस नव्हता जो मला शाल देऊ शकेल. “
पुढे सयानीने सांगितले की, “मी 2013 मध्ये ‘मार्गरीटा विद अ स्ट्रॉ’ चित्रपटासाठी शूटिंग करत होते. तेव्हा एक इंटिमेट सीन दरम्यान डॉक्टरांनी कट म्हटल्यानंतरही ती व्यक्ती मला किस करत (talking)राहिली.” शेवटी सयानी म्हणाली की, “मी इंटिमेट सीनवर संपूर्ण पुस्तक लिहू शकते. लोक म्हणतात की इंटीमेट सीन करणे सिंपल असते कारण ते तांत्रिक पद्धतीने केले जाते. पण तसे नसते.याच्या आडून अनेक लोक याचा गैरफायदाही घेतात.”
चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या ग्लॅमरमाचे वास्तव तुम्हाला दिसत नाही. हे कधीकधी खूप कठीण असते. दिग्दर्शकाच्या मनात काय आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचे दृश्य हवे आहे ते पडद्यावर (talking)आणणे आव्हानात्मक असते. कोणताही इंटिमेट सीन शूट करणे खूप कठीण असते. त्यामध्ये अनेक समस्या उद्भवतात.बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ताने जॉली एलएलबी 2, जब हॅरी मेट सेजल, आर्टिकल 15 आणि बार बार देखो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी
आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा