पतीसोबत वाद पत्नीने उचलले टोकाचे पाऊल अत्यंत हैराण करणारी घटना

 उत्तर प्रदेशातील सुरियावा रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेने आपल्या (anger)दोन वर्षांच्या मुलीसह रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिलेने टोकाचे पाऊल उचलले. पतीने पोलिस चाैकशीमध्ये काही हैराण करणारे खुलासे केले आहेत.एक धक्कादायक घटना पुढे येताना दिसत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. एका महिलेने पतीच्या रागात थेट रेल्वेसमोर उडी घेतली.

यावेळी तिच्यासोबत तिची दोन वर्षांची लहान मुलगी देखील होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी पतीची चाैकशी केली असता त्याने हैराण करणारे खुलासे केले. ही घटना उत्तर प्रदेशच्या सुरियावा रेल्वे स्टेशनजवळची आहे. रेल्वे स्टेशनजवळ महिला आणि तिच्या मुलीचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह सापडलेल्या महिलेचे नाव लक्ष्मी बिंद असून ती भदोही गावची रहिवासी आहे. तिच्या पतीने पोलिसांना सांगितले की, तिला माझ्यासोबत गुजरातला यायचे होते. पण मी तिला नेण्यास नकार दिला. त्यानंतर तिने हे धक्कादायक पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, दानुपूर येथील रहिवासी(anger) वीरेंद्र बिंद हे गुजरातमध्ये नोकरी करतात. त्यांचे कुटुंबिय भदोही गावात राहते.

दिवाळीच्या सुट्टीला वीरेंद्र बिंद हा गावी आला असता त्याच्यासोबत गुजरातला जाण्यासाठी लक्ष्मीने हट्ट धरला. पतीने सध्या घेऊन जाण्यास नकार दिल्याने ती आपल्या माहेरी रागात निघाली. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादानंतर लक्ष्मी निघाली असता पतीने तिला कुठे जात आहे म्हणून विचारले असता तिने मरण्यासाठी जात असल्याचे म्हटले. यावर पतीला वाटले की, तिने रागाच्या भरात म्हटले.

वीरेंद्र याने पोलिसांना सांगितले की, सर मला वाटले की, ती रागाच्या भरात बोलत आहे आणि ती तिच्या आई वडिलांच्या घरी गेली असावी. इतक्या छोट्या गोष्टीसाठी (anger)ती टोकाचे पाऊल उचलेले असे वाटले नव्हते. मी आता काय करू माझी बायको आणि मुलगी दोघीही गेल्या. मी सर तिला गुजरातला घेऊन गेलो असतो तर बरे झाले असते म्हणताना यावेळी वीरेंद्र हा दिसला. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत असल्याचेही सांगितले जातंय.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा

डॉक्टरांनी सुचवलेली 7 जादुई फळं फक्त 20 रुपयांत हाडांना बनवा लोखंडासारखी मजबूत

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा