नवीन वर्षात सर्वनाशाची चेतावणी; बाबा वेंगाचं भीषण भाकी
2025 वर्षाबद्दल बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खूप भयानक आहे.(prediction) बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सूक असतात. 2025 साठी बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी भीतीदायक असून जगाचे टेन्शन वाढविणारी आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2025 मध्ये आपत्ती, अनेक विचित्र घटनेसह लोकसंख्या देखील कमी होवू शकते.2025 वर्षाबद्दल बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या सगळ्यांचे टेन्शन वाढविणार आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2025 पासून अंतिम काळाची सुरुवात होणार आहे. 2025 मध्ये युरोपमध्ये एक भयंकर युद्ध सुरू होऊ शकते, ज्यामुळे मोठी आपत्ती येईल आणि त्यात जिवीतहानी सह मालमत्तेची हानी होऊ शकते.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, युरोपमधील युद्धामुळे संपूर्ण खंड नष्ट होऊ शकतो. हे युद्ध युरोपला संपूर्णपणे नष्ट करू शकते. या युद्धामुळे केवळ आर्थिक हानीच नाही, तर सामाजिक स्तरावरही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्याचा दीर्घकाळ परिणाम राहू शकतो. वेंगा यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष(prediction) व्लादिमीर पुतीन यांच्या विजयाबद्दलही वक्तव्य केलेले आहे. सर्व काही बर्फासारखे वितळून जाईल, फक्त एकच अपवाद असेल, व्लादिमीरचा गौरव, रशियाचा गौरव, या युद्धामुळे जागतिक पातळीवर सर्वनाश होण्याची शक्यता आहे.
बाबा वेंगा यांची एक आणखी भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिम प्रशासन असेल. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, त्या काळात भू-राजनीतिक बदल देखील पाहायला मिळू शकतात. 2076 पर्यंत संपूर्ण जगात कम्युनिस्ट प्रशासनाच्या पुनरागमनाची शक्यता असेल, असे ही बाबा वेंगा यांनी सांगितले आहे.बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाणी केलेल्या आहेत,(prediction) ज्या आत्तापर्यंत खऱ्या ठरलेल्या आहेत. स्टॅलिनची मृत्यू, सोविएत संघाचे विभाजन, दुसरे महायुद्ध किंवा 2004 मधील त्सुनामी- सूनामीसह अनेक घटना बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार घडलेल्या आहेत.
बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा होते. वयाच्या 12 वर्षी त्यांना अंधत्व आले. या घटनेनंतर त्यांच्यात एक विशेष शक्ती विकसित झाली, ज्यामुळे ते भविष्यातील घटनांची भविष्यवाणी करू शकत होते. त्यांनी आपले जीवन बुल्गारियामध्ये व्यतीत केले. तसेच स्वतःच्या मृत्यूची ही भविष्यवाणी केली होती. त्यांच्या निधनापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांचे निधन 11 ऑगस्ट 1996 रोजी होईल, आणि अगदी त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. असं सांगितले जाते की, आजही त्यांची भविष्यवाणी खरी ठरते.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी
आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा