थंडीत आरोग्यदायी राहण्यासाठी हा ज्युस पिणं आवश्यक रेसिपी समजून घ्या

हिवाळा सुरु झाला की वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे (juice)आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला हिवाळ्यात सर्व आजारांपासून लांब राहायचे असेल तर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवावी लागणार आहे. कारण जर तीच कमकुवत असेल तर तुम्हाला वेगवेगळे संक्रमण होण्याचा धोका असतो. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती मजबूत असते त्यांची आजारांशी लढण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही योग्य आहार घेणं खूप गरजेचं असतं. प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टीींचा आहारात तुम्ही समावेश केला पाहिजे.

आजच्या धावपळीच्या युगात योग्य आहार घेणं शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही जर योग्य आहार घेऊ शकत नसाल तर तुम्ही एका गोष्टींचा ज्यूस नक्की घेतला पाहिजे. विशेषत: हिवाळ्याच्या हंगामात तुम्ही तो बनवून पिऊ शकता.बीटरूट, गाजर आणि आले यांचे साल किसून घ्या. सफरचंदचे तुकडे ही घ्या. आता ते मिक्सरमध्ये किंवा ज्युसरमध्ये टाकून मिक्स करुन घ्या. जर रस खूप घट्ट वाटत असेल तर त्यात तुम्ही पाणी घालू शकता. जर तुम्हाला ते गोड हवे असेल तर तुम्ही त्यात मध घालू शकता. आता एका ग्लासमध्ये हा ज्युस काढून त्यात काही आवळा आणि पुदिन्याची पानेही टाकू शकता.

एबीसी ज्युसचे फायदे

बीटरूट, गाजर, आले आणि सफरचंदापासून बनवलेला हा ज्युस तुम्हाल हिवाळ्यात फायदेशीर ठरु शकतो. कारण यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. या ज्युसमध्ये (juice)अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी9 आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक मिळू शकतात. ज्यामुळे तुमची त्वचा, केस आणि पचनशक्ती देखील वाढू शकते. याला एबीसी ज्यूस असेही म्हटले जाते.

या ज्युसचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. (juice)त्यामुळं लोकं हिवाळ्यात कमी पाणी पितात. जेव्हा शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते तेव्हा बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही या ज्युसचे नियमित सेवन केले तर रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते.

हेही वाचा :

आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार

चाहत पांडेसोबत रजत दलालचा रोमँटिक डान्स, चाहते थक्क Video

शिंदे नको-नको म्हणतायत, पण भाजपला त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद का द्यायचंय