फक्त एकच गोष्ट द्या, फडणवीस CM होताच सुळेंची मोठी मागणी
राज्यात आता महायुती सरकारचा कारभार सुरू झाला आहे. निवडणूक(political updates) काळात जी आश्वासनं दिली होती त्यांची पूर्तता करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सीएम पदाची शपथ घेताच सुळेंनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या आश्वासानाची आठवण करून दिली आहे. डिसेंबरपासून किंवा १ जानेवारीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना २१०० रुपये जमा करा असे सुळे यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे(political updates) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक काळात देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण करुन दिली. सुळे पुढे म्हणााल्या, फडणवीसांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून २१०० रुपये देणार आहोत. आता नवीन वर्ष सुरू होत आहे. डिसेंबर महिना तर सुरू झाला आहे. पण शक्य असेल तर याच महिन्यात किंवा नव्या वर्षात १ जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये जमा करा.
राज्यात जर आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रुपये देणार होतो. त्यांनी मात्र अटीत बसणाऱ्यांना २१०० रुपये देणार असल्याचे सांगितले होते. आता ही वाढीव रक्कम कधीपासून महिलांच्या खात्यात जमा होईल असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.
राज्यात महायुतीचा मोठा विजय झाला. महाविकास आघाडीला मात्र मोठा पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीच्या या निकालावर सुळेंनी पुन्हा एकद भाष्य केलं. राज्यात महायुतीला मिळालेलं बहुमत आम्ही मान्य करत नाही. याचं कारण आहे. काही ठिकाणी मतदानात गॅप आहे. अनेक मतदारसंघात उमेदवार एक किंवा दोन अशीच मते मिळाली आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात असलो तरी हा मॅन्डेट आम्ही पूर्ण मान्य करत नाही.
हेही वाचा :
थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!
IND VS AUS मॅचमध्ये राडा, संतापलेल्या सिराजने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला बॉल फेकून मारला
राज ठाकरे म्हणजे भाजपाच्या हातातलं खेळणं; फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राऊतांची फटकेबाजी