प्राजक्ता माळीचे चाहत्यांना न्यू इअर गिफ्ट, ‘फुलवंती’नंतर दिसणार ‘या’ चित्रपटात

नवीन वर्ष सुरु असल्यामुळे सध्या सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण आहे. अशातच आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात ही प्रसिद्ध कलाकार मंडळी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे(new film) गमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले असून यामध्ये स्वप्नील जोशीचा हटके लूक दिसत आहे, तर बाकीचे कलाकार घाबरलेल्या आणि गोंधळलेले दिसतायेत.

त्यामुळे ही भानगड काय आहे? हे समजायला मार्ग नाहीये. चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज आणि धमाल मनोरंजनाची ट्रीट देणारा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटाची(new film) कथा अजून गुलदस्त्यात असली तरी, या चित्रपटातील भन्नाट कलाकार मंडळींच्या एकत्र येण्याने हास्याचे जबरदस्त स्फोट घडतील हे नक्की. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांनी केले आहे.

‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे तर संगीत रोहन रोहन यांचे आहे.

स्वप्नील जोशीने नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्राजक्ता माळी घाबरलेली दिसत आहे. तसेच इतर कलाकार देखील या पोस्टरमध्ये दिसत आहेत. त्यासोबतच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये हातात बॉटल आणि काळ्या रंगाचा गॉगल लावून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात देखील दिसत आहे. तसेच याच कार्यक्रमातील काही कलाकार देखील यामध्ये दिसत आहेत.

स्वप्नील जोशीने हे पोस्टर शेअर करताना त्याला खास कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, तुमच्या 31st च्या पार्टीत ‘चिकी चिकी बुबूम बूम’ चित्रपटाची release date सांगतोय. तारीख लक्षात ठेवा. 28 फेब्रुवारी 2025 पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ‘चिकी चिकी बुबूम बूम’ बघा आणि मग हसायचं थांबवणं तुमच्या हातात नाही.

हेही वाचा :

एलॉन मस्क यांनी बदललं स्वत:चं नावं; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

नव्या वर्षाचा पहिला आठवडा आणणार धनयोग, 4 राशींचे भाग्य चमकणार

Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम!