व्हॉट्सॲप आता ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?

WhatsApp हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे, सुमारे 2 अब्ज मासिक युझर्स आहेत. व्हॉट्सॲप सतत नवनवीन फीचर्स युझर्सना देत आहे, ज्यामुळे काही जुनी डिव्हाईस यापुढे सपोर्ट करणार नाहीत. याचा अर्थ काही जुन्या अँड्रॉइड फोनवर WhatsApp काम करणार नाही. आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सॲपने जुन्या अँड्रॉईड फोनचा(phone) सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जानेवारी 2025 पासून, Android KitKat किंवा जुन्या व्हर्जनच्या Android फोनवर WhatsApp कार्य करणार नाही. जे जुने अँड्रॉइड मॉडेल वापरतात, त्यांना व्हॉट्सॲप वापरायचे असेल तर त्यांना त्यांचे (phone)फोन अपग्रेड करावे लागतील. जुन्या अँड्रॉइड व्हर्जनसह व्हॉट्सॲप काम करणार नाही.
कारण या फोनमध्ये स्थापित हार्डवेअर व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट फिचर्सना सपोर्ट देऊ शकणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सॲपवर मेटा एआय नावाचे फिचर जोडण्यात आले होते. हा एक AI चॅटबॉट आहे जो लोकांना मदत करण्यासाठी जोडला गेला आहे. हे अत्याधुनिक फीचर असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने काम करते.
जुन्या अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सॲप सपोर्ट आजपासून बंद होत आहे. या फोनमध्ये Samsung Galaxy S3, Samsung Galaxy Note 2, Samsung Galaxy S4 Mini, Motorola Moto G (फर्स्ट जनरेशन), Motorola Razr HD, Moto E 2014, HTC One X, HTC One X+, HTC Desire 500, HTC Desire 601, LG यांचा समावेश आहे. Optimus G, LG Nexus 4, LG G2 Mini, LG L90, Sony Xperia Z, Sony Xperia SP, Sony Xperia T आणि Sony Xperia V सारख्या अनेक जुन्या Android फोनचा समावेश आहे.
व्हॉट्सॲपने iOS 15.1 किंवा त्याहून जुन्या आवृत्तीवर चालणाऱ्या आयफोनसाठी सपोर्ट बंद करणार असल्याचे जाहीर केले होते. म्हणजेच ते iPhone 5S, iPhone 6 आणि iPhone 6 Plus वर काम करणार नाही. तथापि, आयफोन युझर्सकडे 5 मे 2025 पर्यंत नवीन डिव्हाइस खरेदी करण्यासाठी आणि एक्सचेंज करण्यासाठी वेळ आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार
BSNL चे नवे रिचार्ज प्लॅन्स; कमी किमतीत जास्त वैधतेचा लाभ!
रील्ससाठी ट्रेनच्या सीट फाडण्याचा धक्कादायक प्रकार! VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले म्हणाले…