नववर्षात सलमानची आठवण! ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला खास जुना फोटो!

संपूर्ण देशभरात नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आले. अशातच काही बॉलिवूड कलाकारांनी देखील त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, अशाच एका बॉलिवूड (actres)अभिनेत्रीला नवीन वर्ष सुरु होताच बॉलिवूड अभिनेता सलमान खानची आठवण आली. या अभिनेत्रीचे नाव रवीना टंडन आहे.

नुकतेच अभिनेत्री (actres)रवीना टंडनने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये रवीना टंडन अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कुटुंबासोबत आणि तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
दरम्यान, अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केलेले हे फोटो 2024 चे असून तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती सलमान खानसोबत हटके पोज देताना दिसत आहे. त्यासोबत या फोटोमध्ये रवीना टंडनची मुलगी देखील दिसत आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना रवीन टंडनने फोटोंना खास कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल आणि मला हसवल्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाने भरून जावो. मला आणि माझ्या मुलाला असेच आनंदी ठेव. सर्व मंगलम ! ॐ शांति शांति शांति ही असं तिने म्हटले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने नवीन वर्षाच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. रवीना टंडन आणि सलमान खान किती चांगले मित्र आहेत हे आता सर्वांनाच माहीत आहे. रवीना टंडन अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसते. अशा परिस्थितीत रवीना टंडननेही नववर्षानिमित्त सलमान खानचे आभार मानण्याची संधी सोडली नाही.
रवीना टंडनची ही हटके स्टाईल चाहत्यांना देखील प्रचंड आवडली आहे. चाहते रवीना टंडन आणि सलमान खानलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमान खान देखील गेल्या आठवड्यामध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी देखील सलमान खान आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसला.
हेही वाचा :
बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला तब्बल ४९६ कोटींचा जीएसटी
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? बड्या नेत्यानी केलं वक्तव्य
‘माझा निर्णय योग्य होता! मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मिस करत नाही’ MS Dhoni निवृत्तीवर काय म्हणाला ?