“बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या…”; जयंतीनिमित्त शिवसेनेची मोदी सरकारकडे मोठी मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला दबदबा निर्माण करणारे नेते बाळासाहेब ठाकरे(todays political news) यांची जयंती आहे. राजकीय वर्तुळामध्ये आणि शिवसेना समर्थकांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून मोठ्या उत्साहामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारकडे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

मुंबईमध्ये खासदार संजय राऊत(todays political news) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राला स्वाभिमानाची, लढण्याची प्रेरणा देण्याच काम माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या. पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेनाप्रमुखांच ऋण मान्य करुन बाळासाहेबांचा विचार पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते.

बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला, देशाला समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या, ते सत्तेवर कधी आले नाहीत. म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल कधी झाले नाहीत. ही सगळी पद सहकाऱ्यांना, सामान्य शिवसैनिकांना दिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर-वीर करण्याच काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं,” अशा भावना खासदार राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.

दोन्ही शिवसेनेचे(todays political news) दोन मेळावे होत असल्यामुळे देखील संजय राऊतांनी खोटक टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “शिवसेनेचे दोन गट वेगवेगळ्या सभा वैगेर घेतायत. ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, जे खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना एक गोष्ट समजली पाहिजे, माननीय शिवसेनाप्रमुखांनी उभ्या आयुष्यात वेगळा गट निर्माण केला नाही. त्यामुळे गट हा शब्द चुकीचा आहे. जिथे मातोश्री आहे, तिथे शिवसेना आहे.

बाजारात डुप्लीकेट औषध असतात, कपडे असतात, असा शिवसेनेच्या नावाने चायना माल बाजारात आला असेल तर तो तात्पुरता असतो. दिवाळीत चिनी फटाके येते. वात पेटते पण वाजत नाही. अशा गोष्टी भाजपाकडून निर्माण झाल्या आहेत. भाजपा स्वत: चिनी माला आहे. म्हणून ते राजकारणात चिनी मालाचा पुरवठा करत असतात,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना शिवसेनेतर्फे आवाहन आहे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरव करा, ही शिवसेनेची मागणी आहे, तर तुम्ही खरे. हिंदू ह्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा :

बांगलादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ! 

 6 वर्षांच्या चिमुरडीवर बाप-लेकानेच केला लैंगिक अत्याचार

रोहित शर्माची साडेसाती संपेना! 9 वर्षानंतर रणजी ट्रॉफीत खेळायला उतरला पण….