झटपट आणि स्वादिष्ट टोमॅटो पुलाव घरी बनवा सोपी रेसिपी नोट करा!

भात झाल्याशिवाय जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. भातासोबत डाळ, (tomato)चपाती, भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात टोमॅटो पुलाव बनवू शकता. टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये आणि वेळात टोमॅटो पुलाव तयार होतो.

टोमॅटो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. शरीरामध्ये विटामिन ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात टोमॅटोचे सेवन करावे. मात्र आपल्यातील अनेकांना(tomato) शिजवलेला टोमॅटो खायला आवडत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो पुलाव बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

साहित्य:

  • तांदूळ
  • टोमॅटो
  • तेल
  • लाल तिखट
  • हळद
  • हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • मटार
  • आलं लसूण पेस्ट

कृती:

  • टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ साफ करून नंतर 30 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा.
  • कुकरमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करून घ्या. कांदा टोमॅटो शिजल्यानंतर तेल सुटण्यास सुरुवात होईल.
  • शिजलेल्या कांदा टोमॅटोमध्ये सर्व मसाले (tomato)आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • मसाले मिक्स केल्यानंतर त्यात मटार टाकून भिजवून घेतलेले तांदूळ टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून वरून कोथिंबीर टाकून कुकरचे झाकण लावून घ्या.
  • कुकरच्या 5 शिट्या काढून गॅस बंद करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटो पुलाव.

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव