महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा! जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र आता एका क्लिकवर मिळणार

जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र(certificate ) मिळवण्यासाठी अर्जदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकारी कार्यालयात बऱ्याचदा फेऱ्या माराव्या लागतात. तरीदेखील कधीकधी काम होत नाही. मात्र आता नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र(certificate ) आता एका क्लिकवर मिळणार आहे. ही सर्व प्रक्रिया जलद आणि सुलभ होण्यासाठी संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित केली जाणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली असून येत्या महिन्याभरात ही प्रणाली कार्यन्वित होणार आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्ती जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग यांना सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश, निवडणूक आरक्षण आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र(certificate ) आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सध्याच्या प्रक्रियेत हे प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप अडचणी येतात. तसंच, अनेक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठीही अडचणी येतात.

राज्य सरकारने बार्टी म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून जातवैधता आणि जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रीया सुलभ होणार आहे. या योजनेला सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे.

नेमकं काय होणार?
– जातवैधता आणि जातप्रमाणपत्रांसाठी नागरिकांनी केलेल्या अर्जासाठी एआयचा वापर होणार आहे. यामध्ये डिजी लॉकरसारख्या प्लॅटफॉर्मसह एकत्रित काम केले जाणार आहे.

– अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मुळ पत्ता, वडिलांचे नाव, पतीचे नाव ही माहिती थेट आधारकार्डशी संलग्न करुन पडताळणी केली जाणार आहे.

– तसंच या प्रक्रीयेमुळं चुकीची नोंद किंवा अर्जातील कागदपत्राची त्रुटी लगेच दाखवली जाईल. त्यामुळं चूक लगेच दुरुस्त करता येईल.

– अर्ज करताना एकच अर्ज आणि एकच प्रक्रिया असेल त्याद्वारेच प्रमाणपत्र वितरित केले जाईल

– ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल. तसंच, यामुळं दलालांचे कामदेखील संपेल. त्यांच्याकडून होणारी संभाव्य फसवणूक टळेल.

हेही वाचा :