कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोम आजाराचा दुसरा बळी; सीपीआरमध्ये पाच जणांवर उपचार सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोम(syndrome) आजाराचा दुसरा बळी गेला आहे. रेंदाळ ढोणेवाडीमधील वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएस बाधित पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकजण व्हेंटिलेटरवर आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील गौराबाई गावडे (वय 60) यांचा जीबीएस सिंड्रोम आजाराने गुरूवारी संध्याकाळी मृत्यू झाला. सीपीआर रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहितीही घेतली आहे.
गावडे यांना तीन दिवसांपूर्वी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना जीबीएस सिंड्रोमची(syndrome) लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्लाजमापेरीसीसचे उपचार चालू होते. परंतू उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील जीबीएसच्या पहिल्या बळीमुळे मात्र याची चर्चा होताना दिसत आहे. सीपीआरमध्ये दाखल झालेले जीबीएसचे पहिले दोन रूग्ण हे कर्नाटकातील तर तिसरा रूग्ण असलेली मुलगी झारखंडमधील होती. तिसऱ्याच दिवशी या 12 वर्षीय मुलीचे पालक डिस्चार्ज घेवून झारखंडला गेल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :
एक मुलगा, 2 मुली…, भररस्त्यात मुलाचा दोघींसोबत रोमान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
महायुतीनंतर आता महाविकास आघाडीत ‘या’ मुद्यावरून बिघाडी; ठाकरेंना काँग्रेस देणार झटका?
महाराष्ट्रात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला; रुग्णसंख्या वाढतानाच सांगलीत दोघांचा मृत्यू