सज्ञान मुलीलाही वडिलांकडून पोटगी मिळण्याचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय

वडिलांकडून, स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान आणि अविवाहित मुलीला(daughter) देखील पोटगी मागण्याचा हक्क आहे, असा महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हिंदू दत्तक व निर्वाह कायद्यातील तरतुदीनुसार हा निर्णय देण्यात आला आहे.

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी अकोला कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर सुनावणी करताना, हे स्पष्ट केले. कुटुंब न्यायालयाने सज्ञान मुलीला(daughter) पोटगी मंजूर केल्यामुळे, वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

वडिलांनी दावा केला होता की, फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी- CRPC) कलम १२५ नुसार, सज्ञान अविवाहित मुलगी, पोटगी मिळण्यास पात्र नाही.

उच्च न्यायालयाने वडिलांचा दावा अंशतः मान्य केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, सीआरपीसी कलम १२५ नुसार, केवळ शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या सज्ञान अविवाहित मुलीलाच पोटगी मिळू शकते. मात्र, हिंदू दत्तक व निर्वाह कायदा कलम २० नुसार, स्वतःचे पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या प्रत्येक सज्ञान अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे.

या प्रकरणातील मुलगी, मुंबईमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिचे आई-वडील कौटुंबिक वादामुळे विभक्त झाले आहेत, आणि मुलगी आईसोबत राहते. तिच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे, तिने अकोल्याच्या कुटुंब न्यायालयात पोटगीसाठी अर्ज केला होता. कुटुंब न्यायालयाने तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली होती.

हेही वाचा :

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत अन् चीनला दणका

सोन्या – चांदीच्या किंमतीत घसरण, काय आहेत आजचे दर? 

सरकारने सेट केली डेडलाइन, 1 एप्रिलपासून विना रजिस्ट्रेशन विकले जाणार नाहीत SIM Card