वयाच्या 49 वर्षी सुष्मिता सेन अडकणार लग्नबंधनात

अभिनेत्री सुष्मिता सेन वयाच्या 49 व्या वर्षीही अविवाहित आहे. सुष्मिता अनेकदा(single) रिलेशनशिप्समध्ये राहिली आहे, मात्र अद्याप तिने कोणाशीच लग्न केलं नाही. इन्स्टाग्रामवरील लाइव्ह सेशनदरम्यान चाहत्यांसोबत गप्पा मारत असताना सुष्मिता लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. नुकतंच जयपूरला एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहिल्याचं तिने सांगितलं. त्यावर एका युजरने सुष्मिताला तिच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना सुष्मिताने योग्य जोडीदार शोधण्याच्या महत्त्वावर भर दिला.

ती म्हणाली, “मलाही लग्न करायचं आहे. पण त्यासाठी लग्नाच्या लायक कोणीतरी मिळाला तरी पाहिजे. असंच लग्न होतं का? हृदयाचं नातं हे अत्यंत रोमँटिक असतं असं म्हणतात. मग एखादी व्यक्ती हृदयापर्यंत पोहोचायला तरी हवी. मग लग्नसुद्धा होईल.” सुष्मिता तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी लहान मॉडेल (single)आणि अभिनेता रोहमन शॉलला डेट करण्यासाठी चर्चेत आली होती. हे दोघं काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र 2021 मध्ये त्यांनी ब्रेकअप जाहीर केला.

ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमन यांच्यात चांगली मैत्री आहे. रोहमनला अनेकदा सुष्मिता आणि तिच्या कुटुंबीयांसोबत पाहिलं गेलंय. रोहमनशी ब्रेकअप झाल्यानंतर सुष्मिता ही आयसीसीचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांचे मालदीव व्हेकेशनचे (single)फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. मात्र लगेचच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा समोर आल्या.

सुष्मिता अविवाहित असली तरी ती दोन मुलींची आई आहे. मॉडेलिंग करत असताना तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. या दोघींचं संगोपन सुष्मितानेच केलंय. विशेष म्हणजे सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन याचंही तिच्या मुलींशी खूप चांगलं नातं आहे. तो अनेकदा त्यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतो. सुष्मितासोबतच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत रोहमन म्हणाला होता, “आम्ही तर गेल्या सहा वर्षांपासून एकत्र आहोत. यात नवीन काय आहे? आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहिलो आहोत आणि भविष्यातसुद्धा राहू. आमच्यात काहीतरी खास नक्कीच आहे आणि ते सर्वांना दिसून येतं.”

हेही वाचा :

होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु

लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार

कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन