ऐश्वर्या रायची ‘ही’ सवय मला अजिबात आवडत नाही, अखेर अभिषेकने मौन सोडलं!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन(Entertainment news) यांच्या वैवाहिक जीवनाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर अभिषेकच्या जुन्या मुलाखतींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने पत्नीबद्दल काय आवडते आणि काय नाही याबद्दल खुलासा केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.

‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोमध्ये अभिषेक बच्चनने(Entertainment news)आपल्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले. त्याने स्पष्ट केले की त्याला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे ऐश्वर्या त्याच्यावर प्रचंड प्रेम करते. मात्र, त्याला तिच्या पॅकिंग करण्याच्या सवयीचा प्रचंड त्रास होतो. त्याच मुलाखतीत अभिषेकने असंही सांगितलं की, त्याने ऐश्वर्याशी लग्न केवळ ती मिस वर्ल्ड होती किंवा जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून केले नाही.

एका जुन्या मुलाखतीतही त्याने सांगितले होते की, ऐश्वर्याचा प्रसिद्धी किंवा सौंदर्य यापेक्षा तिच्या व्यक्तिमत्त्वाने तो प्रभावित झाला होता. त्याने असेही नमूद केले की दोघांमध्ये उत्तम समजूत असून त्यांच्या वैवाहिक जीवनातील अनेक आठवणी अविस्मरणीय आहेत.

2007 मध्ये आलेल्या ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ऐश्वर्या आणि अभिषेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर होते. त्यावेळी एका पत्रकाराने ऐश्वर्याला विचारले होते की लग्नानंतर तिने स्वतःला कितपत बदलले आहे. यावर तिने स्पष्ट उत्तर दिले होते की, ती विवाहाचा आनंद घेत आहे आणि भविष्यात आई होण्याची उत्सुकता बाळगून आहे. तिने असेही स्पष्ट केले की विवाहामुळे तिने स्वतःला गमावले असे काहीही वाटत नाही.

ऐश्वर्या राय बच्चनने 1997 मध्ये मणिरत्नम दिग्दर्शित ‘इरुवर’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘गुरु’, ‘रावण’ आणि अलीकडील ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटांसाठी तिने मणिरत्नमसोबत काम केले. नुकत्याच झालेल्या ‘आयफा 2024 उत्सव’मध्ये या चित्रपटाने १३ नामांकने मिळवली.

एका मुलाखतीत ऐश्वर्याने मणिरत्नमबद्दल बोलताना सांगितले की, “मी त्यांच्या दिग्दर्शकीय शैलीबद्दल बोलू शकत नाही कारण मी त्यांना नेहमीच गुरु मानले आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आज त्यांच्या चित्रपटासाठी मिळालेली प्रसिद्धी पाहून आनंद होतो. 13 नामांकने मिळवणे ही मोठी गोष्ट असली तरी ही संख्या इथवरच थांबू नये.”

हेही वाचा :

होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु

लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार

कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन