मलायकासारखं व्हा सडपातळ तिचं टॉप सीक्रेट एका ड्रिंक्समध्ये प्याल तर तुम्हीही

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वयाच्या 51 व्या वर्षी(drink) देखील तिच्या फिटनेससाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. एका मुलाखाती दरम्यान मलायकाने तिच्या दैनंदिन जीवनशैलीतील शेड्यूल तिच्या चाहत्यांशी शेअर केला. चला तर जाणून घेऊया मलायकाच्या फिटनेसचे सिक्रेट्स.मलायकासारखं व्हा सडपातळ, तिचं टॉप सीक्रेट एका ड्रिंक्समध्ये, प्याल तर तुम्हीही…

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वयाच्या 51 व्या वर्षी देखील तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना अगदी लहान वयामध्ये कोलेस्ट्रॉलच्या समस्या उद्भवतात परंतु मलायकाने तिच्या शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत असते. मलयका तिच्या सोशल मिडीयावर फिटनेसचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते.(drink) एका मुलाखाती दरम्यान मलायकाने तिच्या टोन्ड आणि फिट बॉडी कशी ठेवते याबद्दल तिने तिच्या चाहत्यांशी शेअर केले आहे. मलाईकाच्या या फिटनेस टिप्समध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असतो चला जाणून घेऊया.

मलायका सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करते. त्यासोबतच आठवड्यातून 2-4 वेळा त्यामध्ये मेथीच्या पावडरचा देखील समावेश असतो. मेथी आणि जिऱ्याच्या पाण्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. या पेयाचे सवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. या पेयामुळे तुमच्या पोटाचे आरोग्य सुधारते आणि पचना संबंधित समस्या दूर होण्यास मगत होते. या पेयामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून शरीर डिटॉक्स होण्यास मदत करते.

जिऱ्याच्या आणि मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास आणि नियंत्रित राहाण्यास मदत होते. या पेयामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून तुमच्या शरीरामध्ये हेल्दी फॅट्स वाढवण्यास मदत करते. त्यासोबत तुम्ही ओव्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढतो ज्यामुळे (drink) पचनाच्या समस्या दूर होतात आणि पोटाभोवती घेर वाढत नाही. जिऱ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करतात आणि ओव्यामधील एन्झाईम्स कार्बोहायड्रेट्स तोडण्यास मदत करतात.

या शिवाय जिऱ्यामध्ये आणि ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहाण्यास मदत होते. जिऱ्याचे आणि ओव्याचे पाणी तुमच्या पोटाचे आरोग्य आणि पचनक्रिया निरोगी ठेवते. याशिवाय जिरे आणि ओवा तुमच्या शरारीतल रक्ताचे शुद्धीकरण करूण तुमच्या आरोग्याला फायदे देतात. या पेयाचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेला देखील फायदे होतात. पिंपल्स आणि त्याचे डाग दूर होण्यास मदत होतात.

जिऱ्याचे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 2 ग्लास पाणी घ्या. अर्धा चमचा मेथीचे दाणे, जिरे आणि ओवा त्यामध्ये मिक्स करा. त्यानंतर रात्रभर हे सर्व मिश्रण भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उठल्यावर रिकाम्या पोटी प्यावे. तुम्ही जर हे पाणी थोडं कोमट केल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. या ड्रिंकमध्ये तुम्ही काळे मीठ मिसळल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. काळ्या मीठाच्या वापरामुळे तुमच्या पचना संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

हेही वाचा :

धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..

हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!

काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?