मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक

स्वारगेट स्थानकामधील एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या मुसक्या(arrested) आवळल्या.

अत्याचारानंतर दत्ता गाडे फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. आरोपी सापडत नसल्याने पोलीस टीकेचे धनी झाले होते. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मोठ्या थरारानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. दत्तात्रय गाडेला त्याच्या गुणाट या गावातून अटक(arrested) करण्यात आली आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे त्या दिवसापासून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु तो काही हाती लागत नव्हता. त्याच्यावर एक लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दुसरीकडे पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी गाडे हा गुणाट येथील ऊसाच्या शेतात लपून बसला आहे. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने त्याला हुडकून काढले. रात्रीच्या अंधारात त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. मात्र अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
अटक केल्यानंतर आज दत्तात्रय गाडेला कोर्टात हजर करण्यात येईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडू तब्बल 13 पथके तयार करण्यात आली होती. गुणाट गावातही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु, पोलिसांनी त्याला शोधून काढण्यात कोणतीच कसर ठेवली नाही.
दरम्यान, या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्व खापर खासगी बसस्थानकाच्या सुरक्षारक्षकांवर फोडले आहे. पोलीस या ठिकाणी नियमितपणे गस्त घालत होते. अत्याचार घडला त्या दिवशीही पोलिसांनी गस्त घातली होती. या प्रकारामुळे महिला चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. आता थेट बसमध्येच अत्याचार झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा :
जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल
मलायकासारखं व्हा सडपातळ तिचं टॉप सीक्रेट एका ड्रिंक्समध्ये प्याल तर तुम्हीही
सरपंचाच्या डोक्यात सैतान घुसला २ बहिणींवर अत्याचार केला आजीने केली मदत