करिश्मा कपूरवर दु:खाचा डोंगर; हार्ट अटॅकने संजय कपूरचं निधन

बॉलिवूडमधून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे माजी पती संजय कपूर यांचं वयाच्या 53व्या वर्षी अचानक निधन झालं आहे. यूकेमध्ये पोलो खेळताना त्यांना हार्ट अटॅक(heart attack) आला आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. या बातमीने कपूर आणि सचदेव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी काही तास संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघातावर शोक व्यक्त करत केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संजय कपूर हे यूकेमध्ये हॉर्स पोलो खेळत असताना मैदानावरच कोसळले(heart attack). तातडीने वैद्यकीय मदत मिळवूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. ते ऑटो कंपोनेंट्स उत्पादन करणाऱ्या ‘सोना कॉमस्टार’ कंपनीचे चेअरमन होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने कॉर्पोरेट क्षेत्रातही मोठा धक्का बसला आहे.

संजय कपूर यांनी १२ जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर प्रतिक्रिया देत ट्विट देखील केलं होतं: हे ट्विट आता संजय कपूर यांच्या अंतिम संदेशापैकी एक ठरलं आहे, आणि त्यामध्ये व्यक्त केलेली भावना अजूनच हृदय पिळवटून टाकणारी वाटत आहे.

करिश्मा कपूरसोबतचं वैवाहिक आयुष्य आणि विभक्तीनंतरची नवी सुरुवात :
संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचं लग्न २००३ साली झालं होतं. हे लग्न १३ वर्ष टिकून २०१६ साली घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ साली संजय कपूर यांनी प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे – अजारियस, जो आता फक्त ७ वर्षांचा आहे. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना समायरा आणि कियान हे दोन मुलं आहेत.

संजय कपूर यांच्या मृत्यूने केवळ करिश्मा कपूरच नव्हे तर त्यांच्या सर्व नातलगांनाही मोठा धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वीच अपघातग्रस्त कुटुंबांसाठी प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीने स्वतः या जगाचा अचानक निरोप घेतला, ही बाब अनेकांना सुन्न करणारी ठरली आहे.

हेही वाचा :