बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या माजी पती संजय कपूर यांच्या अचानक निधनाने (death)कपूर कुटुंबासह संपूर्ण इंडस्ट्री शोकाकुल झाली आहे. संजय कपूर यांना इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी ते वयाच्या 53 व्या वर्षी होते. या दु:खद घटनेनंतर करीना कपूर करिश्माकडे पोहोचली आणि रडत रडत बाहेर पडतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रात्री उशिरा करिश्माच्या घरी जमला कुटुंबीयांचा ओघ :
करिश्माच्या माजी पतीच्या निधनाची(death) बातमी समजताच कपूर कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार रात्री उशिरा तिच्या मुंबईतील घराकडे रवाना झाले. करीना कपूर आपल्या पती सैफ अली खानसोबत पोहोचली. त्यावेळी करीना गाडीत डोके खाली घालून रडताना दिसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती डोळे पुसताना दिसली. करिश्माने मात्र यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
करिश्माच्या या दुःखद प्रसंगात तिच्या घनिष्ठ मैत्रिणी मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांनी देखील तिच्या घरी पोहोचून भावनिक आधार दिला. अमृता अरोरा पती शकील लडाकसोबत आली होती. घराबाहेरचा संपूर्ण परिसर मीडियाच्या उपस्थितीने व्यापलेला होता.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003 साली झाले होते. ११ वर्षांच्या सहजीवनानंतर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुले आहेत – समायरा आणि कियान, जे सध्या करिश्मासोबत राहतात. घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा – अजारियस आहे.
View this post on Instagram
संजय कपूरच्या निधनाने (death)करिश्मा भावनिकदृष्ट्या खूप खचून गेली आहे. जरी त्यांचं वैवाहिक नातं संपलं असलं, तरी दोन मुलांचे वडील, आयुष्याचा एक भाग हरवल्याचं दुःख ती व्यक्त करत आहे. कपूर कुटुंबाने अजून अधिकृतपणे काही जाहीर केले नसले तरी सर्व सदस्य तिच्या सोबत आहेत.
हेही वाचा :