उष्णतेचा भडका! सूर्य आणखी आग ओकणार, राज्यात आज कुठे कसं तापमान?

राज्यात तापमानामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यातील (temperature)कमाल तापमान चांगलंच वाढले आहे. राज्यात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. उष्णतेचा भडका उडाल्यामुळे राज्यातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पहाटे हलकी थंडी आणि दिवसा कडाक्याचे ऊन असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात मुंबईसह सगळीकडेच उन्हाचे चटके जाणून लागले आहे. तापमानाचा पारा हळूहळू चढत आहे. राज्यातील सोलापूरमद्ये देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजही राज्यात तापमानात कमालीची वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोलापूर पाठोपाठ चंद्रपूर येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची (temperature)नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, मराठवाड्यातील परभणी, अकोला, ब्रह्मपुरी येथील तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. कोल्हापूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर पोहचले आहे.
वाढते तापमान आणि उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले (temperature)आहेत. नागरिकांनी वाढते तापमान लक्षात घेता काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. तसंच, जास्तीत जास्त पाणी प्यावे असा सल्ला दिला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळत आहेत.
हेही वाचा :
चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल
संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का
‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी