कच्च्या केळीपासून बनवा चविष्ट अन् पौष्टिक चटणी चव अशी बोटं चाटत रहाल

दक्षिण भारतात केळीचे अनेक प्रकार आढळतात, ज्यापासून लोक (taste)केळीची भाजी, पकोडा, डोसा, चिप्स इत्यादी अनेक पदार्थ बनवतात. पण कच्च्या केळ्यापासून चटणी देखील बनवता येते, हे काही लोकांसाठी नवीन असू शकते. कच्च्या केळ्याची चटणी दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे. ही चटणी फक्त चावीलाच चांगली लागत नाही तर आरोग्यासाठीही फायद्याची ठरते .

केळीची चटणी ही अधिकतर लोकांनी खाल्ली नसावी मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की याची चव फार उत्कृष्ट लागते. तुम्ही जेवणाच्या जोडीला या चटणीला सर्व्ह करू शकता. याने तुमच्या जेवणाची(taste) चव द्विगुणित होईल, शिवाय घरातील सर्वांनाच ती फार आवडेल. तुम्ही ही चटणी एकदाच बनवून अनेक दिवस साठवून ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया केळीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
4-5 कच्ची केळी
सुकी लाल मिरची
हिरवी मिरची
कढीपत्ता
मोहरी
जिरे
चिंचेचे पाणी
नारळ किसलेले
मीठ
हिरवे धणे आणि आले पेस्ट
कृती
यासाठी सर्वप्रथम कढईत तेल टाका
यानंतर यात सुकी लाल मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, मोहरी आणि जिरे टाका आणि परतून घ्या
नंतर त्यात चिंचेचे पाणी घालून मिक्स करा. दोन ते तीन मिनिटांनी गॅस बंद करून थंड होऊ द्या
आता मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे सोबत थंड केलेल्या(taste) मिरचीचे मिश्रण घालून हिरवे धणे आणि आले घालून बारीक वाटून घ्या
आता पाणी उकळून त्यात मीठ आणि केळीचे तुकडे घाला आणि उकळवून घ्या
पाणी उकळल्यानंतर केळी सोलून त्याचे छोटे तुकडे करा
एका भांड्यात केळीचे तुकडे घ्या, मिक्सरमध्ये वाटलेली मिरचीची पेस्ट आणि दही घ्या
आता हे तिन्ही एकत्र मॅश करा
पुन्हा एकदा पॅनमध्ये तेल गरम करा
यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, तिखट, हळद आणि चणा डाळ घाला
हा तडका आता वाटलेल्या चटणीवर ओता
अशाप्रकारे तुमची कच्च्या केळीची चटणी तयार आहे, गरमागरम जेवणासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
हेही वाचा :
असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका Video
झोपलेल्या लेकीवर बापाची वाईट नजर, आईला जाग आली तेव्हा…’ संतापजनक प्रकार समोर!
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या! राज्यात एकाचवेळी घेण्यात येणार वार्षिक परीक्षा