होळीची आनंदवार्ता! 2 रुपयांनी स्वस्त झाले डिझेल, असे आहेत पेट्रोलचे दाम

एक दिवसापूर्वीच केंद्र सरकारने देशातील महागाईचा आलेख जाहीर केला. (cheaper)त्यानुसार देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्क्यांहून खाली उतरला. तर होळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसत आहे. मुंबईतील ग्राहकांसाठी ही आनंदवार्ता आहे. इतर महानगरात मात्र इंधनाच्या किंमतीत वाढ दिसून आली. दिल्ली ते चेन्नईपर्यंत सर्वच शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 पैसे ते 1 रुपये प्रति लिटरपर्यंत दरवाढ दिसून आली. सर्वाधिक वाढ ही कोलकत्ता शहरात दिसून आली. तर देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसली.

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किरकोळ घसरण दिसली. आखाती देशात कच्चा तेल्याच्या किंमती 70 डॉलरच्या जवळपास आहे. तर दुसरीकडे अमेरिकन ऑईलच्या किंमतीत 67 डॉलर प्रति बॅरलहून अधिक पोहचल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली आहे.
देशातील चार महानगरांपैकी मुंबई वगळता इतर शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ दिसून आली. नवी दिल्ली आणि चेन्नई या महानगरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 पैशांची वाढ (cheaper)दिसून आली. दिल्लीत पेट्रोलचा भाव आता 94.77 रुपए प्रति लिटर तर डिझेल 87.67 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत 100.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव 92.39 रुपये प्रति लिटर होईल.
कोलकत्तामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीत सर्वाधिक एक रुपये प्रति लिटर वाढ दिसून आली. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत 1.07 रुपये प्रति लिटरची वाढ दिसून आली. ही किंमत 105.01 रुपये प्रति लिटर इतकी झाली. डिझेलची किंमत 1.06 रुपये प्रति लिटरने वाढली. हा भाव आता 91.82 रुपये प्रति लिटर झाला आहे .
तर मुंबई, आर्थिक राजधानीतील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. IOCL च्या आकड्यांनुसार, मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत (cheaper)44 पैसे प्रति लिटरची कपात दिसली. तर किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक 2.12 रुपये इतकी कपात झाली आहे. त्यानंतर डिझेलची किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाले.
कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्लूमबर्गच्या आकड्यांनुसार, आखाती देशात कच्चे तेल ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 0.14 पैशांची घसरण दिसली. कच्चे तेल 70.85 रुपये प्रति बॅरलवर पोहचले आहे. गेल्या दोन महिन्यात कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास 14 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर अमेरिकन कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित घसरण दिसली.
हेही वाचा :
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी
पालकांची धाकधुक वाढवणारी बातमी! यंदा शाळांचे…
यंदाचा गुढीपाडवा नशीब पालटणारा! या 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होतोय