लाडक्या बहिणींची निराशा, आता २१०० रुपये कधी येणार?

लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये कधी येणार असा प्रश्न(disappointment) सर्वांनाच पडलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात २१०० रुपयांची तरतूद होईल, असं सांगितलं होतं. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. पुढच्या पाच वर्षात कधीही लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची घोषणा होऊ शकते.

लाडक्या बहिणींचा मार्चचा हप्ता कधी मिळणार?
विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, अशी घोषणा महायुती सरकारने केली होती. दरम्यान, अजूनही २१०० रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.काही दिवसांपूर्वी आदिती तटकरेंनी विधानसभेत २१०० रुपयांबाबत माहिती दिली होती. लाडकी बहीण योजनेत या अर्थसंकल्पात पैसे दिले जातील, अशी घोषणा आम्ही कधीच केली नव्हती. जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, असं त्यांनी सांगितले होते. (disappointment)त्यामुळे महायुती सरकारच्या येत्या ५ वर्षाच्या काळात कधीही २१०० रुपये येऊ शकतात. परंतु हे पैसे कधी येणार याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी- मार्चचा हप्ता जमा
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्च रोजी जमा झाला. तर मार्चचा हप्ता १२ तारखेला जमा झाला आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीच. म्हणजेच त्यांचे अर्ज (disappointment)कदाचित बाद झालेले असू शकतात.
९ लाख महिला बाद
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ९ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. एकूण ५० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांबाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. आता अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
हेही वाचा :
अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?
पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी
‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!
पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी