‘टोल टोल टनटनाटन…’, सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, काय दिला सल्ला?

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख (lawyer)राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ‘टोल टोल टनटनाटन’ म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. दरम्यान सदावर्ते यांच्या टीकेनंतर मनसेकडून देखील जोरदार पलटवार करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय, असा सवाल मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ‘राज ठाकरेंवर काय बोलायचं? तर मी एक म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल -टोल टनटनाटन, अरे टोल के उपर गिनो भाई,(lawyer)अरे टोल के उपर गिनो, लेकीन राज समज लेना इस राज के अंदर कभी भी भाषा के उपर अपनी राजनिती की रोटी न शेकना’ असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांच्या या टीकेला मनसेकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘कोण गुणरत्न सदावर्ते ते कर्जतवरून बोलतायेत की कसाऱ्यातून बोलत आहेत? त्यांच्या मागे बुजगावनं उभं असतं, बुगुबुगु (lawyer)करत एक प्राणी उभा असतो. ही यांची पात्रता, आणि हे आमच्यावर टीका करणार आमच्या परिवारावर टीका करणार यांची लायकी काय? महाराष्ट्रासाठी यांनी काय केलंय आणि मुळात आज होळीचा सण आहे, मजा करा घाणेरडं राजकारण करू नका’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला देखील खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कृपाशंकर यांची राज ठाकरेंवर टीका करण्याची लायकी नाही, असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी

‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी