जय पवार यांच्या हृदयावर कोणाचे अधिराज्य? अजितदादांच्या सूनबाई ऋतुजा पाटील आहे तरी कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या(daughter) घरी मंगलकार्य होणार आहे. धाकटे चिरंजीव जय पवार यांचे लग्न जुळले आहे. त्यांच्या आत्या आणि शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच ही गोड बातमी गोटातून दिली आहे. ऋतुजा पाटील लवकरच पवार कुटुंबांच्या सूनबाई होणार आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह होणार आहे. साखरपुड्यापूर्वी गुरूवारी रात्री दोघांनी चुलत आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. पुण्यातील घरी जाऊन त्यांनी थोरल्या पवारांची भेट घेतली. या सर्व प्रसंगाचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

10 एप्रिल रोजी साखरपुडा
आता या शाही विवाहाची धामधूम सुरू झाली आहे. जय पवार हे अजितदादांचे धाकटे चिरंजीव आहेत. ऋतुजा पाटील या त्यांच्या हृदयावर राज्य करणार आहेत. जय पवार हे पक्ष फुटीनंतर अनेक (daughter)राजकीय मंचावर दिसले असले तरी त्यांचा राजकारणापेक्षा उद्योग, व्यवसायाकडे ओढा अधिक आहे. यापूर्वी जय पवार हे दुबईत व्यवसाय सांभाळत होते. पण गेल्या काही वर्षांपासून ते बारामतीतून त्यांची व्यावसायिक सूत्र हाताळत आहेत.

10 एप्रिल रोजी दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे समजते. जय आणि ऋतुजा यांनी गुरूवारी शरद पवार यांची भेट घेतली आणी आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या कॅमेऱ्याबद्ध आठवणी सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या (daughter)सोशल अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

कोण आहेत ऋतुजा पाटील?
जय पवार यांची पत्नी आणि पवार कुटुंबियांची भावी सून ऋतुजा पाटील या, सोशल मीडिया कंपनीचे व्यवस्थापक प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. त्या उच्च शिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तर ऋतुजा पाटील यांची बहिणी या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या सूनबाई आहेत. दोघांचा साखरपुडा 10 एप्रिल रोजी होणार असल्याचे समजते.

हेही वाचा :

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी

‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी