टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंग आता क्रिकेटमधील कामगिरीसोबतच सरकारी सेवेतही नवी इनिंग सुरू करणार आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता रिंकू सिंगला योगी सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याच्या सरकारी नियुक्तीसाठी(government officer) तयारी सुरू केली असून, लवकरच तो एका अधिकारपदावर कार्यभार स्वीकारणार आहे. चला जाणून घेऊयात त्याला कोणत्या विभागात जॉइनिंग मिळणार? कोणत्या पदावर तो काम करणार

रिंकू सिंगला उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागात ‘जिल्हा बेसिक शिक्षाधिकारी (BSA)’ पदावर नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मिळत आहे. ‘आंतरराष्ट्रीय पदक विजेते थेट भरती नियमावली 2022’ अंतर्गत त्याची ही नेमणूक होणार आहे. बेसिक शिक्षण संचालनालयाकडून रिंकूला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.
या नेमणुकीनंतर रिंकूला 7 वर्षांच्या आत आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करावी लागणार आहे. तोपर्यंत त्याला पदोन्नती मिळणार नाही. क्रीडा विभागाकडून या नेमणुकीचा प्रस्ताव राज्य सरकारला(government officer) पाठवण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
अलिगढमधील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रिंकू सिंग आज देशातील चर्चेतला खेळाडू आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर वितरक होते आणि रिंकूने सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत कामही केलं होतं. 2023 मध्ये आयर्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या रिंकूने, IPL 2024 मध्ये KKR साठी जबरदस्त खेळ केला. अलीकडेच त्याचा साखरपुडा सपा खासदार प्रिया सरोजसोबत पार पडला आहे.

इतर खेळाडूंनाही मिळणार सरकारी नोकरी
फक्त रिंकू सिंगच नाही, तर इतर काही खेळाडूंनाही उत्तर प्रदेश सरकारकडून विविध विभागांत नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे:
प्रवीण कुमार (पैरा अॅथलीट) – गृहनिर्माण विभागात डीएसपी
राजकुमार पाल (हॉकी खेळाडू) – गृहनिर्माण विभागात डीएसपी
अजीत सिंह (पैरा अॅथलीट) – पंचायती राज विभागात जिल्हा अधिकारी
सिमरन (पैरा अॅथलीट) – पंचायती राज विभागात जिल्हा अधिकारी
प्रीती पाल (पैरा अॅथलीट) – ग्रामीण विकास विभागात BDO
किरण बालियान (अॅथलीट) – वन विभागात क्षेत्रीय वन अधिकारी
हे सर्व निर्णय खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना सार्वजनिक सेवेतही सहभाग घेण्याची संधी देण्यासाठी घेण्यात आले आहेत.
हेही वाचा :