भारतीय संघ(Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून येथे भारत – इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना बुधवार 2 जुलै रोजी पासून सुरु होणार आहे. हा सामना बर्मिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर होणार असल्याने टीम इंडियाचा संघ हा बर्मिंघममधील मुख्य भागात राहतोय. मात्र टीम इंडिया राहत असलेल्या ठिकाणाजवळील सेंटेनरी स्क्वायरमध्ये संशयास्पद पॅकेट आढळून आल्याने टीम इंडियातील खेळाडूंना बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला या माहितीची पुष्टी देत सांगितले की, बर्मिंघम सिटी सेंटर पोलिसांकडून सोशल मीडियावर पोस्टनंतर खेळाडूंना हॉटेलमधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला. भारतीय क्रिकेटपटू (Team India)सहसा टीम हॉटेलजवळील भागात फिरत असतात आणि दुसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी अनेक खेळाडू वारंवार ब्रॉड स्ट्रीटला भेट देत होते.
कर्णधार शुभमन सह एकूण आठ जणांनी मंगळवारी एजबेस्टनमध्ये सराव केला तर इतर 10 सदस्यांनी आराम केला. बर्मिंघम सिटी सेंटर पोलिसांच्या वतीने एक्सवर पोस्ट करण्यात आली. त्यांनी लिहिलं की, ‘आम्ही बर्मिंघम सिटी सेंटरच्या स्क्वायरजवळ नाकाबंदी केली आहे आणि एका संशयास्पद पॅकेटची चौकशी करत आहोत. आम्हाला दुपारी तीन वाजण्याच्यापूर्वी ही माहिती मिळाली. खबरदारी म्हणून, याची चौकशी सुरू असताना अनेक इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कृपया या परिसरात येणं टाळावं’.
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 5 विकेटने(Team India) विजय मिळवून सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवरचा भारताचा इतिहास पाहिला तर मागील 48 वर्षांमध्ये केवळ एकदाच भारताला या स्टेडियमवर टेस्ट सामना जिंकण्यात यश आलंय. यंदा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या मैदानावर विजय मिळवून इतिहास घडवते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :