महाराष्ट्रातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ६७ वर्षांच्या व्यक्तीने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले.(crosses ) वर्धा जिल्ह्यातील मौजा धनोडी गावात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा धनोडी गावा राहणारी एक व्यक्ती हे भयंकर कृत्य केले. गावातील शाळेजवळ आरोपी कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. गावातील नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ प्राणी तक्रार दाखल केली. प्राणीप्रेमींनी या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राणीप्रेमीच्या तक्रारीवरून, मंगळवारी आर्वी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. (crosses )घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे असे पोलिसांनी सांगितले.
समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपीला तात्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी केली. (crosses )याआधी नागपूरमध्ये गायीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला होता.
हेही वाचा :