सांगली जिल्ह्यातील आष्टा शहराजवळ एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिंदे मळा परिसरातील एका शेतातील झाडावर जादूटोणा(witchcraft) केल्याच्या संशयास्पद खुणा सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. झाडाच्या बुंध्याला काळी बाहुली, लिंबू, टाचण्या आणि दोरा बांधलेला आढळून आला. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे.

ही घटना सागर शिंदे यांच्या शेतात घडली असून, ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अनेकांनी हा प्रकार जादूटोणाशी(witchcraft) संबंधित असल्याची शक्यता वर्तवली आहे.
अलीकडच्या काळात आष्टा शहरात जादूटोणा, बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचे प्रमाण वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. रस्त्यांवर उतारे टाकणे, झाडांवर लिंबू-कोंबड्या लटकवणे अशा घटना वारंवार घडत असून, त्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे.
या घटनेनंतर परिसरात संशयाचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. काही स्थानिक नागरिकांनी हे कृत्य स्थानिक बुवाबाजी करणाऱ्या टोळ्यांचे असावे, असा अंदाज व्यक्त केला आहे. काहीजणांनी राजकीय हस्तक्षेपाचाही संशय व्यक्त केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विज्ञान आणि प्रगतीच्या युगात अशा अंधश्रद्धांचा प्रसार होणं हे समाजासाठी घातक असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दहावा हफ्ता आता…
महिलांनो हुशार असाल तर, पतीसोबत चुकूनही शेअर करू नका ‘या’ 5 गोष्टी!
शरद पवारांना मोठा झटका, दोन माजी मंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर