आईसोबत मिळून सासूला झोडलं, जमिनीवर पाडून झिंज्या उपटल्या; VIDEO व्हायरल

गाझियाबादच्या गोविंदपुरम भागातून घरगुती हिंसाचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(domestic) एका सॉफ्टवेअर इंजिनिअर सुनेने आपल्या सासूला तिच्या आईच्या मदतीने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी सून आणि तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धक्कादायक घटना १ जुलै रोजी घडल्याची माहिती आहे. सून आकांक्षा हिचं आपल्या सासूसोबत काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. यावेळी आकांक्षाची आई देखील उपस्थित होती. वाद टोकाला गेला आणि आकांक्षाने आपल्या सासूवर हात उगारला. त्यांना खाली पाडून मारहाण केली. (domestic) ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सासू सुदेश देवी स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंरतु सून आकांक्षा आणि तिची आई सासूवर वारंवार हल्ला करत मारहाण करीत आहेत. या घटनेनंतर सासूने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच सून आणि तिच्या आईविरोधात तक्रार दाखल केली. (domestic) परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतला नाही.

आकांक्षाचे वडील दिल्ली पोलिसांत उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे तक्रार नोंदवून न घेण्याचा दबाव आणण्यात आला असावा असा संशय आहे. मात्र, काही दिवसानंतर या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला. यानंतर हे प्रकरण समोर आलं. तेव्हा पोलिसांना गुन्हा नोंदवून घेत कारवाईला सुरूवात केली. आता आकांक्षा आणि तिच्या आईविरोधात गोविंदपुरम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :